पुढील 40 दिवस भारतासाठी अत्यंत कठीण असणार असल्याचं म्हटलं जात आहे. भारतातील कोविड 19 रूग्णसंख्या (COVID 19 In India) आणि त्यामधील वाढ याबाबत जानेवारी (January) महिन्यात अधिक सजग राहण्याची गरज असल्याचं अधिकृत सूत्रांनी म्हटलं आहे. आज भारतातील मागील कोविड 19 रूग्णसंख्येच्या स्फोटांचा अभ्यास करता हे निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, यापूर्वीच्या कोरोना लाटेचा अभ्यास करता त्या ईस्ट आशियामध्ये कोरोना लाटेनंतर 30-35 दिवसांनी भारतामध्ये आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, संसर्गाच स्वरूप सौम्य असण्याची शक्यता आहे. जरी कोरोना लाट आली तरीही त्याच्यामुळे होणारे मृत्यू आणि हॉस्पिटलमध्ये कोरोना रूग्ण भरतीचं प्रमाण अत्यंत कमी असणार आहे. हे देखील नक्की वाचा: Covid New Variant BF7: चीनमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा कहर; भारतातही झाली विषाणूची एंट्री, काय आहेत BF7 विषाणूची लक्षणं .
चीन, साऊथ कोरिया मध्ये वाढती कोरोना रूग्णसंख्या पाहता, भारतामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार पुन्हा कामाला लागलं आहे. त्यांच्याकडून कोरोना स्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. आरोग्य यंत्रणा देखील आपत्कालीन परिस्थितीमध्ये पुन्हा सुसज्ज पद्धतीने काम करण्यासाठी तयार ठेवण्याच्या देखील सूचना दिल्या गेल्या आहेत.
नुकतेच मॉक ड्रिल्स पार पडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी देखील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
ओमिक्रॉनचा व्हेरिएंट BF.7 मुळे पुन्हा जगात कोरोना रूग्णसंख्येत वाढ बघायला मिळत आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार या व्हेरिएंटमध्ये संसर्ग करण्याची क्षमता अधिक आहे. एक BF.7 बाधित व्यक्ती 16 अन्य लोकांना या व्हेरिएंटच्या जाळ्यात लोकांना आणू शकतो.