FASTag KYC Procedure Update: लवकरात लवकर अपडेट करा फास्टॅग केवायसी तपशील, 31 जानेवारी शेवटी तारीख; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया बंद
FASTag, Toll Plaza | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

FASTag KYC Procedure Update: महामार्गांवर टोल (Toll) भरण्यासाठी फास्टॅग (FASTag) वापरणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तुमच्या फास्टॅगचे केवायसी अपूर्ण असल्यास, तुमचा फास्टॅग 31 जानेवारीनंतर निष्क्रिय केला जाईल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोमवारी सांगितले की, 'वन व्हेईकल वन फास्टॅग' या मोहिमेअंतर्गत फास्टॅगचा चांगला अनुभव घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ज्या फास्टॅगचे केवायसी 31 जानेवारीपर्यंत पूर्ण झाले नसेल ते काळ्या यादीत टाकले जातील किंवा निष्क्रिय केले जातील. तर तुमच्या फास्टॅगचे केवायसी पूर्ण झाले नसल्यास विलंब न करता ते पूर्ण करा. असे न केल्याने तुमच्या खिशावरचा भार वाढेल. एवढेच नाही तर दुप्पट टोल टॅक्सही भरावा लागणार आहे. एनएचएआयने फास्टॅग वापरकर्त्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार आपल्या नवीनतम फास्टॅगसाठी 'नो युवर कस्टमर' (KYC) प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.  (हेही वाचा: One Vehicle One FASTag: येत्या 31 जानेवारीपर्यंत 'हे' काम न केल्यास बंद होणार तुमचा फास्टॅग, NHAI ने जारी केली सुचना)

फास्टॅगच्या केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे-

यासाठी तुम्ही आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खालीलपैकी कोणतेही कागदपत्र वापरू शकता-

1. पासपोर्ट

2. ड्रायव्हिंग लायसन्स

3. मतदान आयडी

4. पॅन कार्ड

5. आधार

6. NREGA जॉब कार्ड (राज्य सरकारच्या अधिकार्‍याने स्वाक्षरी केलेले )

तसेच, या केवायसी कागदपत्रांसह तुमच्या वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्राची (RC) प्रत समाविष्ट करा.

जाणून घ्या फास्टॅगचे केवायसी कसे अपडेट कराल- 

फास्टॅगचे केवायसी अपडेट करण्यासाठी https://fastag.ihmcl.com वर जा.

होमपेजच्या उजव्या बाजूला लॉगिन पर्याय असेल. त्यावर क्लिक करा.

यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका.

जर तुम्हाला पासवर्ड माहित नसेल तर कॅप्चा टाका आणि ओटीपीवर जा.

यानंतर मोबाईलवर ओटीपी येईल. हा ओटीपी प्रविष्ट करा.

आवश्यक रकाने भरा आणि ओळख आणि पत्ता पुरावा दस्तऐवज प्रदान करा.

आता पुढील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर केवायसी अपडेट केले जाईल.

सबमिशन तारखेपासून 7 कामकाजाच्या दिवसांत तुमची केवायसी प्रक्रिया केली जाईल.

दरम्यान, फास्टॅग ऍप्लिकेशन्ससह विविध सेवांसाठी केवायसी प्रक्रिया ही एक महत्त्वाची पायरी आहे. ही प्रक्रिया संस्थांना त्यांचे ग्राहक ओळखण्यास आणि सत्यापित करण्यास मदत करते, सुरक्षित व्यवहार सुनिश्चित करते. तुमच्या केवायसी तपशिलांमध्ये काही बदल असल्यास, ते त्वरित अपडेट करणे आवश्यक आहे.