Farmers Protest: विविध शेतकरी संघटनांनी आयोजित केलेल्या 'चलो दिल्ली' मार्चला (Chalo Delhi Farmers March) हरियाणा ते दिल्लीपर्यंत वेग आला आहे. पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) सुनिश्चित करणारा कायदा लागू करावा या प्रमुख मागणीसह इतरही अनेक मागण्या घेऊन विविध शेतकरी संघटना उद्या म्हणजेच 13 फेब्रुवारी 2023 पासून आंदोलन सुरु करत आहेत. त्यासाठी हे शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत. शेतकरी मोर्चा (Farmers' March) आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हरियाणा आणि दिल्ली या दोन्ही सरकारांनी आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी पावले टाकली आहेत. या उपाययोजनांचा भाग म्हणून दिल्ली-यूपी सीमा आणि शहादरा ॲड गांधी नगर आदी परिसरांमध्ये कलम 144 लागू (Section 144 Imposed on Delhi UP Borders) करण्या आले आहे. तर, दुसऱ्या बाजूला हरियाणातून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मार्गावरील शंभू सीमा बंद केली आहे.
इंटरनेट, डोंगल आणि बल्क एसएमएस सेवांवर बंदी
13 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या शेतकरी आंदोलन अधिक व्याप्त होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, हरियाणा सरकारने पंचकुला आणि इतर जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू केले आहे. त्याच बरोबर, दिल्ली सरकारने दिल्ली-यूपी सीमेवर आणि शहराच्या विविध भागांमध्येही असेच निर्बंध लागू केले आहेत. याशिवाय, दोन्ही सरकारांनी ट्रॅफिक ॲडव्हायझरी जारी केल्या आहेत. शिवाय संभाव्य अशांतता टाळण्यासाठी तीन दिवस इंटरनेट, डोंगल आणि बल्क एसएमएस सेवांवर बंदी घातली आहे.
व्हिडिओ
#WATCH | Delhi: Police barricading at Tikri border, ahead of the farmers' call for march to Delhi on 13th February. pic.twitter.com/9IJPXM8okg
— ANI (@ANI) February 12, 2024
कलम 144 अंतर्गत दिल्ली-यूपी सीमा आणि शहादरा ॲड गांधी नगर:
दिल्ली पोलिसांनी कोणत्याही अनिष्ट घटनांना आळा घालण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ईशान्य दिल्लीत आणि उत्तर प्रदेशला लागून असलेल्या सीमेवर फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 लागू केले आहे. हे कलम नियोजित आंदोलनाच्या कालावधीच्या अनुषंगाने 11 मार्चपर्यंत प्रभावी होईल असा अंदाज आहे.
व्हिडिओ
#WATCH | Ambala, Haryana: Shambhu border sealed ahead of the farmers' call for march to Delhi on 13th February. pic.twitter.com/9jbrddosnV
— ANI (@ANI) February 12, 2024
सार्वजनिक मेळावे आणि शस्त्र बाळगण्यास मनाई:
निदर्शकांच्या संभाव्य मेळाव्याच्या पार्श्वभूमीव दिल्ली पोलिसांनी उत्तर-पूर्व जिल्ह्यातील यूपी सीमेवर आणि जवळपासच्या प्रदेशांवर सार्वजनिक मेळाव्यांना मनाई केली आहे. शिवाय, शांततापूर्ण वातावरण राखण्यासाठी बंदुक, तलवारी आणि इतर शस्त्रांसह शस्त्रे बाळगण्यास सक्त मनाई आहे.
व्हिडिओ
#WATCH | Delhi: Police barricading at Ghazipur border, ahead of the farmers' call for march to Delhi on 13th February. pic.twitter.com/00ctNrqenK
— ANI (@ANI) February 12, 2024
बंद सीमा आणि सरकारी संवाद:
पोलिसांनी सुरक्षा उपायांचे कारण पुढे करत हरियाणा-पंजाब सीमा सील केल्या आहेत, स्थानिक पोलिस दलांसोबत CRPF जवान तैनात आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांना पीयूष गोयल यांच्यासह तीन केंद्रीय मंत्र्यांशी चर्चेसाठी निमंत्रण दिले असून, शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.