
Indus Waters Treaty: भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीसंदर्भात (India Pakistan Ceasefire) करार झाला असून लष्करी कारवाईबाबतच्या सामंजस्य कराराची कोणतीही पूर्व किंवा पश्चात अट नाही. तसेच युद्धबंदीनंतरही सिंधू पाणी करार (Indus Water Treaty) स्थगित राहील, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धबंदीच्या करारानंतर आता दोन्ही देश जमिनीवर, हवेत आणि समुद्रात सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवतील.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक पावले उचलली होती. सीमापार दहशतवादाला पाकिस्तानने दिलेल्या पाठिंब्यावर उचललेल्या पावलांमध्ये सिंधू पाणी करार स्थगित करणे समाविष्ट होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात नऊ वर्षांच्या वाटाघाटींनंतर 1960 मध्ये सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. (हेही वाचा - Omar Abdullah On India-Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान युद्धबंदीचे ओमर अब्दुल्ला यांच्याकडून स्वागत; म्हणाले, आधी झाले असते तर जीव गेले नसते)
या करारानुसार पश्चिम नद्या (सिंधू, झेलम, चिनाब) पाकिस्तानला आणि पूर्व नद्यांचे (रावी, बियास, सतलज) पाणी दोन्ही देशांमध्ये वाटले जाईल. त्याच वेळी, या करारानुसार प्रत्येक देशाला नद्यांचे काही विशिष्ट पाणी दुसऱ्या देशाला वाटण्याची परवानगी आहे. या करारामुळे भारताला सिंधू नदी प्रणालीतील 20 टक्के पाणी आणि उर्वरित 80 टक्के पाणी पाकिस्तानला मिळते. (वाचा - India-Pakistan Conflict: भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीवर सहमत; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान)
सिंधू पाणी करार स्थगित राहील -
Indus Waters Treaty will continue to be in abeyance: Sources
Read @ANI Story | https://t.co/sSomC1MGY3#IndusWatersTreaty #India #Pakistan #water pic.twitter.com/vlr4XfSTnu
— ANI Digital (@ani_digital) May 10, 2025
तथापि, आज दुपारी 3.30 वाजता, पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी भारताच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांना फोन केला. यानंतर दोन्ही बाजूंनी आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून जमिनीवर, हवेत आणि समुद्रात सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकारांना सांगितले की, समझोता अंमलात आणण्यासाठी दोन्ही बाजूंना सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि, सोमवारी दुपारी लष्करी ऑपरेशन्स महासंचालक पुन्हा यावर चर्चा करणार आहेत. भारताने पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. त्यानंतर पाकिस्तानने वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. याशिवाय, भारतातील विविध ठिकाणी क्षेपणास्त्र डागले. परंतु, पाकिस्तानचे सर्व डाव लष्कराने हवेतचं उधळून लावले.