केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगावार ( Santosh Gangwar) यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. या माहितीनुसार यापुढे महिलांनाही कामाच्या ठिकणी समान संधी (Equal Opportunity To Women) मिळणार आहेत. यापुढे महिला रात्रीच्या वेळीही (Women Work at Night Shift) पुरुषांच्या बरोबरीने कामाच्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात म्हणजेच रात्रपाळीत (Night Shift) काम करु शकतात. संतोश गंगवार यांनी म्हटले की, श्रमशक्ती भागीदारीत लैंगिक अंतर कमी करण्यासाठी आम्ही सामूहिक प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांचा भाग म्हणून महिलाही आता रात्रपाळीत काम करु शकतात. भारत शिक्षण, प्रशिक्षण, कुशाग्रता, उद्योजगता विकास आणि समान कार्यासाठी समान वेतन निश्चित करत आहे.
संतोष गंगवार हे जी-20 श्रम आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीत बुधवारी (23 जून) बोलत होते. मंत्री गंगवार यांनी म्हटले की, रोजगाराबाबत एक नवा कायदा 2019 मध्ये रोजगार, भर्ती आणि रोजगारांबाबतच्या अटी यांमध्ये लैंगिक आधारावर भेदभाव कमी होईल. सर्व ठिकाणी सर्व प्रकारचे काम करणे आणि ते काम मिळवणे हा महिलांचा हक्क आहे. संबंधित कंपनी, सस्थांनी महिलांच्या सुरक्षिततेची हमी घ्यायला हवी. महिला आता रात्रीचेही काम करु शकतात.
संतोश गंगवार यांनी पुढे सांगितले की, सहवेतन मातृत्व रजा कालावधी 12 आठवड्यांवरुन वाढवून तो 26 आठवडे करण्यात आला आहे. पंतप्रधान मुद्रा योजनेत महिला उद्योजकांना छोटे उद्योग सुरु करण्यासाठी आरथिक सहकार्य केले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून 9 हजार बिलियन रुपये विनातारण कर्ज वितरीत करण्यात आले आहे. ही योजनेत सुमारे 70% महिलांचा सहभाग पाहायला मिळत आहे.
कामगार आणि रोजगारमंत्र्यांनी सांगितले की, सामाजिक सुरक्षेसंबंधी नव्या कायद्यात आता स्वयंरोजगार आणि कार्यबळाच्या इतर सर्व वर्गांमध्येही सामाजिक सुरक्षा संरक्षण कक्षेत समाविष्ट केले जाऊ शकते. असंघटीत क्षेत्रात कामगारांसाठी 2019 मध्ये सुरु करण्यात आलेल्या स्वैच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजनेत 60 वर्षांनंतर सर्वसाधारण निवृत्तीवेतनाचेही प्रावधान आहे.