दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना कथीत मद्य घोटाळ्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील (Delhi excise policy) कथित अनियमिततेच्या चौकशीचा भाग म्हणून सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) मनीष सिसोदिया यांची चौकशी करण्याची शक्यता आहे, केंद्रीय आर्थिक गुप्तचर संस्थेने तिहार तुरुंगात (Tihar Jail) सिसोदिया यांचे जबाब नोंदवण्याची परवानगीसाठी एव्हेन्यू कोर्टात अर्ज दाखल केला असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत सिसोदिया यांचा जबाब नोंदवण्यासाठी ईडीचे अधिकारी दुपारच्या सुमारास तिहार तुरुंगात पोहोचतील. याप्रकरणी सिसोदिया यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गेल्या महिन्यात अटक केली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. दिल्लीतील एका न्यायालयाने मंगळवारी सिसोदीया यांची सीबीआय कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. सुनावणीदरम्यान, सीबीआयने न्यायालयाला सांगितले की एजन्सी आत्ताच पुढील कोठडीची मागणी करत नाही, परंतु "आरोपीने तपास कार्यात सहकार्य करत नाही"