Domestic Flight Ticket Fare: जर तुम्ही विमानाने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण आजपासून देशात विमान प्रवास महागला आहे. याबद्दल नागरिक उड्डाण मंत्रालयाने गुरुवारी रात्री घोषणा करत तिकिट दरात 12.5 टक्क्यांनी वाढ केल्याचे जाहीर केले आहे. हा निर्णय आजपासून देशात लागू करण्यात आला आहे. वाढलेल्या तिकिटाच्या दराचा परिणाम कमीतकमी आणि अधिकाधिक किंमतीवर होणार आहे. त्याचसोबत केंद्र सरकारने देशातील सर्व विमानसेवांच्या देशाअंतर्गत संख्येत 7.5 टक्क्यांनी वाढ करण्यास परवानगी दिली आहे. तसेच एअरलाइन्स कंपन्यांनी प्रवाश्यांची संख्या सुद्धा वाढवण्यास मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता देशाअंतर्गत विमानसेवेसाठी प्रवाशांची संख्या 65 टक्क्यांवरुन 72.5 टक्के करण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसच्या महासंकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली होती. याचा फार मोठा परिणाम एअरलाइन्स कंपन्यांवर पडला होता. मात्र सरकारच्या या पावलामुळे विमानसेवा कंपन्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.(एअर इंडिया पायलट Captain Zoya Agarwal यांची संयुक्त राष्ट्र संघाची महिला प्रवक्ता म्हणून निवड)
यापूर्वी 21 जून रोजी केंद्र सरकारने देशाअंतर्गत विमानसेवांच्या दरात 15 टक्क्यांनी वाढ केली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशाअंतर्गत प्रवासाची संख्या ही कोविडपूर्वीच 80 टक्क्यांवरुन 50 टक्के केली होती. महारोगाच्या काळात नागरिक उड्डाण मंत्रालय सातत्याने विमानसेवांचे दर आणि हवाई श्रमता रेग्युलट करत आले आहेत. त्याचा थेट परिणाम विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या कमाईवर झाल्याचे दिसून आला आहे.(SpiceJet चे प्रवासी आता फ्लाईट मध्येच करू शकणार कॅब बुकिंग; पहा काय आहे ही नवी सुविधा?)
दरम्यान, जेट फ्युलच्या किंमतीत वाढ केल्यानंतर ही चौथी वेळ आहे की देशाअंतर्गत विमानसेवा महागली आहे. तिकिट दरात करण्यात आलेल्या 12.5 टक्क्यांच्या वाढीमुळे मोठा बदल दिसून येणार आहे. दिल्ली ते मुंबईसाठी यापूर्वी 4700 रुपये मोजावे लागत होते. मात्र आता त्यासाठीच नागरिकांना 5287 रुपये भाडे द्यावे लागणार आहे. जर अधिकाधिक भाड्याबद्दल बोलायचे झाल्यास दिल्ली ते मुंबीसाठी 13 हजार रुपये होता. मात्र तेच आता 14,625 रुपये झाले आहे.