SpiceJet Flight | File Image | (Photo Credits: PTI)

बजेट कॅरियर स्पाईस जेट (SpiceJet) कडून आज (12 ऑगस्ट) प्रवाशांसाठी एक नवी सुविधा सुरू झाली आहे. आता प्रवासी फ्लाईट मध्येच कॅब बूक करू शकणार आहेत. यासाठी एअरलाईनची इन फ्लाईट एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्मची स्पाईसस्क्रीन (SpiceScreen) ची मदत घेता येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये दिल्ली एअरपोर्ट (Delhi Airport) वर उतरणार्‍यांना ही सुविधा मिळणार आहे. नंतर हळूहळू मुंबई, पुणे, गोवा, बॅंगलोर, अहमदाबाद, हैदराबाद येथे देखील ही सुविधा मिळणार आहे.

विमानतळावर उतरल्यानंतर कॅब ट्रान्सफरसाठी आता प्रवाशांना तिष्ठत रहावं लागू नये म्हणून डोमेस्टिक एव्हिएशन इंडस्ट्री मध्ये अशाप्रकारे पहिल्यांदाच सेवा उपलब्ध करून दिली आहे. एकदा प्रवाशाने SpiceScreen वर कॅब बूक केली की त्यानंतर कॅब बुकिंग ओटीपी मेसेज एसएमएसद्वारा मिळणार आहे. त्यानंतर विमानतळावर आल्यानंतर कॉल कन्फर्मेशन देखील मिळणार आहे. तार ग्राहकांना प्रवास पूर्ण झाल्यानंतर पेमेंट ऑप्शन हे ऑनलाईन किंवा कॅशच्या स्वरूपात देखील करता येणार आहे.

SpiceJet कडून SpiceScreen ही इन फ्लाईट एंटरटेन्मेंट सिस्टिम मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात देण्यात आली होती. त्याचा वापर स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप वर करता येऊ शकतो. यासाठी केवळ ऑनबोर्ड वायरलेस नेटवर्क ने त्याला कनेक्ट करायचं आहे.

दरम्यान कॅब बुकिंगसाठी या पर्यायाचा वापर करणार्‍यांना विशेष सवलत देणार आहेत. यामध्ये कॅन्सलेशन चार्ज नसतील. तसेच अरायवल गेट वरच ही सोय मिळणार असल्याने प्रवाशांना आता लगेज घेऊन फिरावं देखील लागणार नाही.