31 डिसेंबरपूर्वी करा हे महत्वाचे काम, नाहीतर ATM मधून पैसे काढता येणार नाहीत
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Money Control.com)

जर तुमचे बचत खाते देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकमध्ये असल्यास 31 डिसेंबर पूर्वी हे महत्वाचे काम आटोपून घ्या. नाहीतर तुम्हाला बँकेच्या एटीएम मधून पैसे काढता येणार नाहीत. खरंतर एसबीआय त्यांच्या ग्राहकांना मॅग्नेटिक स्ट्रिप (Magnetic Stripe) डेबिट कार्डला ईएमवी चिप कार्ड असणाऱ्या मध्ये बदलणार आहे. त्यामुळे तुम्ही आतापर्यंत जर मॅगनेटिक स्ट्रिप असणारे डेबिट कार्ड बदलले नसल्यास तर ते लवकरच बदलून घ्या. ग्राहकांना हे डेबिट कार्ड बँकेच्या शाखेत जाऊन 31 डिसेंबर पर्यंत द्यावे लागणार आहे. मात्र तुम्ही असे न केल्यास तुमचे डेबिट कार्ड काम करणे बंद करणार आहे.

एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना डेबिट कार्ड बदलून घेण्याची सुचना दिली आहे. त्यामुळे जुने एटीएम कार्ड बदलून नवे न घेतल्यास तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत. तसेच नवे एटीएम बँकेकडून कोणताही शुल्क न आकारता ग्राहकाला देण्यात येणार आहे. तर आरबीआयच्या मते मॅग्नेटिक स्ट्रिप कार्ड आता हे जुने तंत्रज्ञान झाले आहे. त्यामुळे आता या डेबिट कार्डची जागा EMV घेणार आहेत.(आजपासून 'या' नियमात मोठे बदल, जाणून घ्या नाहीतर होईल नुकसान)

EMV चिप असणारे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डवर एक लहान चिप लावण्यात येणार आहे. त्यानुसार तुमच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. ही माहिती इनक्रिप्टेड असते कारण कोणीही सहज यामधील डेटा चोरी करु नये. तसेच ही चिप असलेल्या एटीएम मधून पैसे काढताना व्यक्तीची एक युनिक ट्राजेक्शन कोड जनरेट होऊन तो वेरिफिकेशनसाठी उपयोगी येतो. मात्र असे मॅग्नेटिक स्ट्रिप मध्ये होत नाही.