
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाला हवाई प्रवास शुल्कावर लक्ष ठेवण्याचा, विशेषतः सणासुदीच्या काळात, दरात वाढ झाल्यास योग्य ती पाऊले उचलण्याचा अधिकार दिला आहे. त्यानुसार, महासंचालनालयाने सक्रीय पुढाकार घेत विमान कंपन्यांशी संपर्क साधला आणि सणासुदीच्या काळात वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त विमानसेवा सुरू करत क्षमता वाढविण्यास सांगितले. या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत विमान कंपन्यांनी खालीलप्रमाणे अतिरिक्त विमानसेवा सुरू करणार असल्याचे कळवले आहे:
इंडिगो: 42 मार्गांवर सुमारे 730 अतिरिक्त उड्डाणे सुरू करणार.
एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस: 20 मार्गांवर सुमारे 486 अतिरिक्त उड्डाणे सुरू करणार.
स्पाईसजेट: 38 मार्गांवर सुमारे 546 अतिरिक्त उड्डाणे सुरू करणार.
प्रवाशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय सणासुदीच्या काळात विमान कंपन्यांच्या दरांवर आणि विमानसेवा क्षमतेवर कठोर देखरेख ठेवणार आहे.
The Directorate General of Civil Aviation (@DGCAIndia) reviews airfare trends ahead of the festive season. #DGCA is mandated by the Ministry of Civil Aviation (@MoCA_GoI) to keep a watch on airfares, especially during the festive season and take appropriate measures in case of… pic.twitter.com/hmHwDdJ8nX
— All India Radio News (@airnewsalerts) October 5, 2025