PM Narendra Modi | (Photo Credits-ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) जम्मू कश्मीर (Jammu & Kashmir) राज्यातील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टर (Nowshera ) येथे पोहोचले आहेत. ते येथे जवानांसोबत दिवाळी साजरी करतील. पंतप्रधानांनी नैशेरा येथे लष्करातील जवानांशी संवाद साधला. या संवादावेळी त्यांनी सांगितले की, आजवर मी माझी प्रत्येक दिवाळी जवानासोबत घालवली आहे. भारतीय लष्करातील जवानांचे सुरक्षा कवच (Suraksha Kawach) आहे. त्यामुळेच भारतातील प्रत्येक नागरिक सुखाची झोप घेऊ शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे बोलताना सांगितले, मी प्रत्येक दिवाळी आमच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसोबत घालवली आहे. आज, मी माझ्यासोबत येथे आमच्या सैनिकांसाठी कोट्यवधी भारतीयांचे आशीर्वाद घेऊन आलो आहे. आपले सैनिक हे 'भारतमाते'चे 'सुरक्षा कवच' आहेत. तुमच्या सर्वांमुळेच आपल्या देशातील लोक शांतपणे झोपू शकतात आणि सण-उत्सवांमध्ये आनंद असतो. (हेही वाचा, Happy Diwali 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह 'या' नेत्यांनी जनतेला दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा)

सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणी सांगत पंतप्रधान म्हणाले, सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी या ब्रिगेडने बजावलेल्या भूमिकेबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. पूर्वी सुरक्षा दलांसाठी संरक्षण उपकरणे खरेदी करण्यासाठी अनेक वर्षे लागायची. संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाची वचनबद्धता हाच जुन्या पद्धती बदलण्याचा एकमेव मार्ग आहे. लडाख ते अरुणाचल प्रदेश, जैसलमेर ते अंदमान निकोबार बेटांपर्यंत सीमावर्ती भागातील संपर्क सुधारला आहे. यामुळे आम्हाला आमची तैनाती क्षमता वाढविण्यात मदत झाली आहे.

ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे जम्मू येथे पोहोचले होते. त्यांनी सुरक्षा स्थितीचा आढवा घेत अंतिम दौरा केला. पंतप्रधानांसोबत दिवाळी हा एक परंपरेचा भाग आहे. ज्याची सुरुवात पंतप्रधानांनी 2014 मध्ये केली. याही वेळी पंतप्रधानांनी जम्मू कश्मीर येथील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांनी ट्विट करुन म्हटले की, दिवाळीच्या या शुभ प्रसंगी देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. या दिवाळीत प्रकाशरपर्व आपल्या जीवनात सुख, संपन्नता आणि भाग्य घेऊन येईल.