Happy Diwali 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह 'या' नेत्यांनी जनतेला दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credits: Getty Images)

Happy Diwali 2021:  आजपासून पुढील पाच दिवस दिवाळीचा सण सर्वत्र साजरा केला जाणार आहे. तर दीपावली म्हणजेच लक्ष्मी पूजन हा सर्वाधिक महत्वाचा दिवस आहे. हिंदू पंचांगानुसार, दीपावलीचा सण हा कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या तिथीला साजरा केला जातो. दिवाळीच्या सणामुळे सर्वत्र आनंद-उत्साहाचे वातावरण आहे. अंध:कारावर वर प्रकाशाचा विजय असणाऱ्या या सणाच्या काळात घरोघरी दिवे, कंदील लावत एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात.तर यंदाच्या दिवाळीच्या सणानिमित्त  पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह अन्य नेते मंडळींनी जनतेला आजच्या दिवशी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीपावलीच्या सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच दिवाळीचा सण हा सर्वांच्या आयुष्यात सुख, संपन्नता आणि सौभाग्य घेऊन येवो असे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.(Happy Diwali Wishes in Marathi: दिवाळी मराठी शुभेच्छा संदेश, WhatsApp Status, Facebook Messages पाठवून साजरा करा दीपोत्सव)

Tweet:

अमित शाह यांनी दीपावलीच्या शुभेच्छा देत असे म्हटले की, प्रकाश आणु आनंदाचा हा सण सर्वांच्या आयुष्यात नवी उर्जा, प्रकाशष आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो.

Tweet:

यंदाच्या दीपावलीत आपले जीवन सकारात्मकतेच्या प्रकाशाने उजळून निघावे, नवी स्वप्ने, नवी उमेद, नव क्षितीजे गाठण्याच्या आपल्या ध्येयासक्त प्रयत्नांना दिव्य यशाची झळाळी प्राप्त व्हावी ही मनोकामना. दीपावलीच्या आनंदमयी, तेजोमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनपूर्वक शुभेच्छा! राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देत ट्विट केले आहे.

राहुल गांधी यांनी असे म्हटले की, दीव्याचा प्रकाश हा कोणताही भेदभाव न करता सर्वांना रोशनी देतो आणि हाच दीपावलीचा अर्थ आहे. आपल्या माणसांमध्ये दिवाळी असो सर्वांच्या मनाला जोडणारी असो.

Tweet:

Tweet:

Tweet:

पुराणकथेनुसार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रीच्या वेळी लक्ष्मी सर्वत्र संचार करते. ज्या ठिकाणी स्वच्छता, सौंदर्य, आनंद, उत्साह अशा सकारात्मक बाबी असतात तेथे लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. म्हणूनच या दिवशी सायंकाळी लक्ष्मीपूजन केले जाते.