Delhi Fire (Photo Credits-ANI)

देशाची राजधानी दिल्ली येथे गेल्या काही दिवसांपासून आग लागल्याच्या घटना थांबण्याचे नावच घेत नाही आहे. त्यात अजून एक भर पडली असून आज (24 डिसेंबर) नरेला येथील परिसरात असलेल्या एका चप्पलांच्या फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 26 गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. फॅक्टरी बंद असल्याच्या कारणास्तव त्याच्या आतमध्ये कोणीही नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र भीषण आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असताना तीन अग्निशमनल दलाचे कर्मचारी जखमी झाल्याचे बोलले जात आहे.

भोरगढ इंडस्ट्रियल परिसरातील प्लास्टिकच्या चप्पल बनवणारी एक फॅक्टरीआहे. सकाळच्या वेळेस फॅक्टरीला आग लागल्याचे सांगितले जात असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आजूबाजूच्या अन्य फॅक्टरीला याचा फटका बसू नये म्हणून काळजीपू्र्वक काम केले जात आहे. एका रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्याने असे सांगितले आहे की, फॅक्टरी बंद असल्याने तेथे कोणीच नव्हते. परंतु आग विझवताना सिलेंडर फुटल्याने तीन अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचरासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(Delhi Fire: दिल्लीत कापड गोदामाला भीषण आग; 9 जणांचा मृत्यू)

ANI Tweet:

अद्याप फॅक्टरी लागलेली आग विझवण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरुच आहे. मात्र वारंवार आगी लागल्याच्या घटनेमुळे दिल्लीकर चिंतेत असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे बोलले जात आहे.