‘Online Trading Scam’ बाबत सजग रहा; Cyber Crime Police कडून अ‍ॅड्व्हायजरी जारी
Cyber Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

सायबर क्राईम (Cyber Crime) च्या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील काही दिवसांमध्ये Online Trading Scam ची प्रकरणं वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता सायबर क्राईम पोलिसांकडून (Cyber Crime Police) पब्लिक अ‍ॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. या स्कॅममध्ये पीडीतांना एका जाहिरातीद्वारा फ्री ट्रेडिंग टीप्स (Free Trading Tips) चे क्लास आहेत असं सोशल मीडीया, व्हॉट्सअ‍ॅप वर सांगितलं जातं. जेव्हा ते जाहिरातीवर क्लिक करतात तेव्हा त्यांना एका अनोळखी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप मध्ये रिडिरेक्ट केलं जातं. फसवणूक करणारे या ग्रुप द्वारा संवाद साधतात. स्टॉक्सची खरेदी विक्री करण्यासाठी फ्री ट्रेडिंग टीप्स देऊ असं आमिष दाखवलं जातं. कालांतराने ट्रेडिंग अ‍ॅप इंस्टॉल करण्यास सांगितलं जातं. यामधून भविष्यात मोठ्या प्रमाणात प्रॉफिट मिळवलं जाईल असं सांगितलं जातं.

पोलिस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, INSECG, CHS-SES, SAAI, SEQUOIA, आणि GOOMI ही अ‍ॅप्स डाऊलोड करण्याचं आवाहन केले जाते. मात्र ही अ‍ॅप्स Securities and Exchange Board of India अंतर्गत रजिस्टर नाहीत. त्यामुळे शेअर्सच्या खरेदीसाठी दिलेली रक्कम फसवणूक करणार्‍यांच्या अकाऊंट मध्ये जमा होते. डिजिटल वॉलेट्स वर खोटे प्रॉफिट्स दाखवले जातात.

जेव्हा फसवणूक झालेली व्यक्ती हा 'नफा' डिजिटल व्हॉलेट्स मधून काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा नफा 50 लाखापर्यंत गेला की मगच तो काढला जाऊ शकतो असं सांगितलं जातं. ही कंपनी पॉलिसी असल्याचं समजून अनेकदा लोकं पैसे गुंतवत राहतात. यामध्ये एका टप्प्यावर त्यांना नफ्यावर टॅक्स भरण्यासही सांगितला जातो. हे नाकारल्यास सारे संवाद गोठवण्याची, युजर ब्लॉक केला जाण्याची धमकी दिली जाते. अनेकांना या टप्प्यांवरच आपली फसवणूक झाल्याचं समजतं. नक्की वाचा: Mumbai Cyber Crime News: सायबर क्राईम प्रकरणी 26 वर्षीय मास्टरमाईंड तरुणास अटक,  देशभरातील घोटाळ्यांशी संबंध; मुंबई पोलिसांची कारवाई .

अनोळखी लिंक्स वर क्लिक करणं टाळा

City Commissioner of Police Sandeep Rai Rathore यांनी लोकांना investment scam बाबत जागृक राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी अनोळखी लिंक्स, व्हॉट्सअ‍ॅप कॉल्स आणि मेसेजेस यांच्याशी बोलताना काळजी घेण्यास सांगितलं आहे.

सायबर क्राईम शी निगडीत कोणतीही घटना, गुन्हा आढळल्यास त्याची तक्रार National Cyber Crime Reporting Portal वर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच 1930 या हेल्पलाईन वर मदत मागण्याचेही आवाहन केले आहे.