Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक करण्यापूर्वी 'Crypto Tax' बाबत जाणून घ्या, वित्त सचीव टीवी सोमनाथन यांनी दिली मोठी प्रतिक्रिया
Cryptocurrency | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

Crypto Tax: क्रप्टोकरन्सी (Cryptocurrency) गुंतणुकीबाबत जगभरात चर्चा सुरु आहे. सहाजिकच भारतातही आहे. त्यामुळे यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात क्रिप्टोकरन्सी अर्थातच डिजिटल चलनाची चर्चा झाली नसती तरच नवल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी क्रिप्टोकरन्सीबाबत केंद्र सरकारचे धोरन स्पष्ट असल्याचे संकेत दिले. त्या म्हणाल्या क्रिप्टोकरन्सीद्वारे आलेल्या उत्पन्नावर 30% कर सरकारला द्यावा लागेल. या घोषणेनंतर गुंतवणूक क्षेत्रात जोरदार चर्चा सुरु झाली की, क्रिप्टोकरन्सीला भारतीय चलनात कायदेशीर दर्जा काय आहे. कारण केंद्र सरकारने अद्यापही क्रिप्टोकरन्सीबाबत निश्चित असा कोणताच कायदा लागू केला नाही. दरम्यान, केंद्र सरकारने पहिल्यांदाच स्पष्ट केले आहे की, क्रप्टो करन्सीमध्ये ट्रेडींग करणे हे बेकायदेशीर नाही. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनीही पत्रकार परिषदेत सांगितले की, क्रिप्टोकरन्सीबाबत सरकार विचार करत आहे. त्यानंतर आम्ही कायदा बनवणार आहोत.

दरम्यान, केद्रीय अर्थसचिव टीव्ही सोमनाथन यांनीही प्रसारमाध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, सरकारचा क्रिप्टोकरन्सीकडे पाहण्याचा दृष्टीकोन स्पष्ट आहे. क्रिप्टो मालमत्तेत ट्रेडींग करणे सरकार गुन्हा मानत नाही. मात्र सरकारने आपल्या परीभाषेत क्रिप्टोतून आलेल्या नफ्याला परीभाषित केले आहे. जसे एखाद्या लॉटरीतून किंवा झउगारातून आलेल्या पैशाला कर लावला जातो तशाच पद्धतीने क्रिप्टोमधून आलेल्या पैशांवर कर लावला जाईल. (हेही वाचा, Cryptocurrency Update: क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठी घसरण, बिटकॉइनला बसला फटका)

सोमनाथ यांनी याच मुलाखतीत पुढे सांगितले की, सध्या हे ग्रे एरियात आहे. क्रिप्टो खरेदी करणे बेकायदेशीर नाही. त्यांनी म्हटले की, आम्ही एक टॅक्सेशनसाठी फ्रेमवर्क जारी केले आहे. ज्यात आम्ही क्रिप्टे अॅसेटाला त्याच पद्धतीने पाहतो, जसे लोक हॉर्स रेस, सट्टा आणि इतर काही दुसऱ्या व्यवहारांकडे पाहतात.

ट्विट

सरकार लवकरच क्रिप्टोबाबत नियमावली जारी करणार आहे, असे विचारचातच टीव्ही सोमनाथन यांनी सांगितले की, सरकारचे धोरण स्पष्ट आहे. त्यावर विस्तृत विचार केला जाईल. आंतरराष्ट्रीय पातळीवरही क्रिप्टोबाबत काय विचार होतो आहे याकडेही पाहिले जाईल. दरम्यन, सरकार कोणतेही पाऊल घाईगडबडीत टाकणार नाही, असेही सोमनाथन म्हणाले.