सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया कडून आज ( 1 डिसेंबर) कोविशिल्ड ही ऑक्सफर्ड आणी अॅस्ट्राझेनेका यांच्याकडून तयार करण्यात आलेली लस सुरक्षित असल्याचं पुन्हा स्पष्टपणे सांगितलं आहे. दरम्यान कोविड 19 वरील ही संभाव्य लस सुरक्षित आणि प्रतिरोधक क्षमता निर्माण करणारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. सोबतच चैन्नई मधील ट्रायल वॉलेंटियर मध्ये झालेल्या 'व्हर्च्युअल न्युरोलॉजिकल ब्रेकडाऊन' सह झालेले अन्य त्रास हे लसीचे दुष्परिणाम नसल्याचंही सीरमने स्पष्ट केले आहे. या चैन्नईच्या व्यक्तीने 8 कोटीचा दावा सीरम विरोधात ठोकला असल्याचं वृत्त होतं. त्याबाबत कायदेशीर कारवाई केल्याचंही सीरमने सांगितलं आहे.
सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया कडून आज देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोविशिल्ड लसीच्या मानवी चाचणी दरम्यान सार्या नियमांचे, नैतिक मानकांचे तसेच गाईडलाईन्सचे पालन करण्यात आले आहे. Data and Safety Monitoring Board and the Ethics Committee ने त्याला स्वतंत्ररित्या हिरवा कंदिल दाखवला आहे. चैन्नईतील घटनेला वॅक्सिनअशी निगडीत मुद्दा बनवला नव्हता असेही स्पष्ट करण्यात आले आहे. उलट सीरमने कोविशिल्ड बद्दल खोटी आणि बदनामीकारक माहिती पसरवण्याबद्दल 100 कोटीच्या प्रतिदाव्याची माहिती दिली आहे. चैन्नईच्या दावा करणार्या व्यक्तीच्या वकिलाने हा प्रतिदावा हे प्रकरण दाबण्यासाठी केला जात असल्याचं सांगितलं आहे.
ANI Tweet
The legal notice was sent to safeguard the reputation of the company which is being unfairly maligned: Serum Institute of India https://t.co/EWKYE5MKgm
— ANI (@ANI) December 1, 2020
सीरम विरूद्ध दावा करणारा 40 वर्षीय व्यक्ती हा चैन्नईचा रहिवासी आहे. पेशाने बिझनेस कंसल्टंट आहे. त्याने कायदेशीर नोटीस पाठवत त्याला व कुटुंबाला झालेल्या त्रासाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
नोटीशीमध्ये acute neuro encephalopathy म्हणजेच कोविशिल्डचा कथित दुष्परिणाम झाल्याचं सांगितलं आहे. त्यांनी 1 ऑक्टोबरला डोस घेतला होता. सीरम प्रमाणेच ही नोटीस लसीच्या उत्पन्न आणि वितरण करणार्या अन्य संस्थांना देखील देण्यात आली होती.