कोरोना रुग्णांमध्ये टीबी संक्रमणाच्या प्रकरणांमध्ये वाढ, सरकारने जाहीर केल्या नव्या गाइडलाइन्स
Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

देशात कोरोना व्हायरसची परिस्थिती असता रुग्णांमध्ये आता टीबीचे संक्रमण होत असल्याची प्रकरणे आता वाढत चालल्याचे दिसून येत आहेत. अशातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सर्व कोविड19 च्या रुग्णांमध्ये टीबीचा धोका उद्भवत असल्याने नव्या गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत. तर अधिकृत विधानानुसार, हे स्पष्ट करण्यात आले आहे की आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाद्वारे सर्व कोविड19 रुग्णांना टीबीची चाचणी आणि कोविड19 वर मात केलेल्यांनी सुद्धा ही चाचणी करावी अशी सिफारीश करण्यात आली आहे. ऑगस्ट 2020 च्या सुरुवातीला राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना उत्तम निगराणी आणि टीबी किंवा कोविड19 चे रुग्ण शोधून काढण्यामध्ये वेग आणण्यास सांगण्यात आले आहे.

या व्यतिरिक्त सरकारने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना टीबी-कोरोना आणि टीबी-आयएलआय/एसएआरआयच्या Bi-Directional Screening चा वापर पुन्हा करावा असा सल्ला आणि मार्गदर्शन केले आहे. मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या गाइडलाइन्स अशावेळी सांगण्यात आल्या जेव्हा कोविड19 च्या लसीमुळे 2002 मध्ये टीबीची प्रकरणे जवळजवळ 25 टक्क्यांची घट झाली आहे. केंद्राने पुढे असे म्हटले की, ओपीडी सेटिंग्समध्ये गंभीर प्रकरणांच्या तपासासह राज्याद्वारे समुदायातील सक्रिय रुग्णांच्या चाचणी अभियानासह याचा प्रभाव कम करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.(Tourist Guidelines: जाणून घ्या कोरोनामुळे कोणकोणत्या राज्यांनी पर्यटकांवर लावले आहेत निर्बंध ?)

दरम्यान, सरकारने स्पष्ट केले आहे की कोविड19 मुळे टीबीच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यासाठी पुरेसे पुरावे नाही आहेत. टीबी आणि कोविड19 या दोन्ही आजारांबद्दल आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, ते रोग संक्रमणात्मक असल्याचे मानले जाते. तसेच मुख्यकरुन लोकांच्या फुफ्फुसावर त्याचा थेट परिणाम होतो. यामध्ये खोकला, ताप आणि श्वास घेण्यास समस्या येते. तर टीबीची लक्षण दिसून येण्यास काही वेळ लागतो आणि आजाराची सुरुवात अगदी धिम्या गतीने होते.