National Highway (Photo Credits-Wikipedia)

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मंगळवारी एका महत्वाच्या निर्णयाची घोषणा केली आहे. गडकरी यांनी वाहन परवानासह अन्य मोटार वाहन कागद पत्रांची वैधता येत्या 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोना व्हायरसच्या(Coronavirus) पार्श्वभुमीवर सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. ही सुचना सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी लागू असणार आहे.(Coronavirus Effect On Indian Economy: विद्यमान वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 3.2% घसरु शकतो- जागतिक बँक)

देशातील सध्याची परिस्थिती पाहता वाहतूकदार आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहेत. त्यामुळेच राज्य सरकारने वाहन परवानासह अन्य कागदपत्रांसंदर्भातील वैधता येत्या 30 सप्टेंबर पर्यंत वाढवल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.(Today's Petrol and Diesel Price: मुंबई, दिल्ली मध्ये इंधन दरवाढ; जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर काय?)

दरम्यान, वाहन परवाना, फिटनेस,परमिट रजिस्ट्रेनसह अन्य काही कागदपत्रांची वैधता नागरिकांना लॉकडाऊमुळे वाढवता येत नाही आहे. त्यामुळेच केंद्रशासित प्रदेश आणि राज्य सरकारने वाहतूक कायदा 1988 अंतर्गत आणि अन्य कायद्याअंतर्गत वाहन चालकांना परमिट, फी किंवा टॅक्स, परमिट संबंधित सूट सुद्धा देण्यात यावी असे ही मंत्र्यांनी विधान केले आहे.