Petrol - Diesel Price | Image Use For Representational Purpose | File Photo

कोरोना संकटात लॉकडाऊनमध्ये असलेलं जग आता जस हळूहळू पुन्हा पुर्वपदावर येण्यासाठी सुरू झालं आहे. तशी वर्दळ वाढल्याने आता गडगडलेले इंधनदर पुन्हा वधारण्यास सुरूवात झाली आहे. आज सलग तिसर्‍या  दिवशी भारतामध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel)  दरामध्ये वाढ झालेली पहायला मिळाली आहे. दरम्यान मुंबई, दिल्लीमध्येही वाढ पहायला मिळाली आहे. आज ANI ट्वीटच्या माहितीनुसआर दिल्लीमध्ये पेट्रोल 0.54 पैसे तर डिझेलचे दर 0.58 पैशांनी वाढले आहेत. तर मुंबईमध्ये 0.52 पैशांनी पेट्रोल आणि 0.55 पैशांनी डिझेलचे दर वाढले आहेत.

आज मुंबईमध्ये डिझेलचा दर प्रति लीटर 69.92 रूपये इतका आहे तर पेट्रोलचा प्रति लीटर दर हा 80.01 वर पोहचला आहे. दिल्लीमध्येही आज इंधनाच्या दरामध्ये वाढ झाली आहे. यामध्ये पेट्रोलचे दिल्लीमधील दर सुमारे 73.00 रूपये प्रतिलीटर इतका आहे आणि डिझेल हे प्रति लीटर 71.17 रूपये वर पोहचला आहे.

ANI Tweet

दरम्यान काही दिवसांपूर्वी विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरामध्येही वाढ करण्यात आली होती. केंद्र सरकारने मे महिन्यात पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क वाढवून 22.98 रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे तर डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढून 18.83 रुपये प्रति लीटर करण्यात आले आहे त्यामुळे देखील पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत.