धक्कादायक! मार्कांची स्पर्धा भोवली, चुलत भावाने शिक्षकासोबत मिळून बहिणीवर केला सामूहिक बलात्कार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: ANI)

उत्तर प्रदेश : अनेकदा कुटुंबातील एखादं मूल दुसऱ्यापेक्षा अभ्यासात अधिक हुशार असतं, यावरून नातेवाईक, शेजारी कमी हुशार मुलाची टिंगल करतात हा प्रकार नेहमीचाच वाटत असला तरी यामुळे उत्तरप्रदेश (Uttar Pradesh)  च्या सीतापूर (Sitapur) मध्ये एक घृणास्पद बाब घडली आहे. आपल्या अभ्यासातल्या हुशार बहिणीचा राग येऊन दोन चुलत भावांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gangrape)  केल्याचे समजत आहे, यात पीडित मुलगी ही अल्पवयीन असून हे कृत्य करण्यात मुलांच्या शिक्षकाचा देखील समावेश होता. या प्रकरणी सर्व आरोपींवर सीतापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधवा मुलीस वडिलांनी 10 हजारात विकले; सामुहिक बलात्कारानंतर पिडीतीने स्वतःला जाळून घेतले

प्राथमिक माहितीनुसार,आपली बहीण अभ्यासात हुशार असल्याने तिच्या चुलत भावांच्या मनात तिच्याबद्दल मत्सर होता. हा राग काढण्यासाठी या दोन भावांनी शिक्षकाच्या मदतीने तिच्यावर अत्याचार करायला सुरवात केली. ही मुलगी अल्पवयीन असल्याने अत्याचार घडत असताना ती बेशुद्ध झाली होती. मात्र त्या अवस्थेतही हे तीन नराधम तिच्यावर बलात्कार करत राहिले . या सर्व प्रकारचा त्यांनी स्वतःच व्हिडीओ बनवला व तो त्या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा दाखवला. या व्हिडीओमुळे झालेला प्रकार सर्वांसमोर उघड झाला आणि त्यानंतर शनिवारी या अल्पवयीन मुलीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या मुलीवर दोन वर्षात तिच्या चुलत भावांनी आणि शिक्षकाने अनेकदा बलात्कार केल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक मधुवन कुमार सिंह यांनी दिली.

धक्कादायक! दीड वर्षाच्या भाचीवर मामाने केला बलात्कार; चिमुरडीला झुडूपात फेकून देऊन झाला पसार

दरम्यान पोलिसांनी पीडित मुलीचे विधान नोंदवले असून, लवकरच आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे सीतापूर पोलिस अधीक्षक एल. आर. कुमार यांनी सांगितले.