धक्कादायक! दीड वर्षाच्या भाचीवर मामाने केला बलात्कार; चिमुरडीला झुडूपात फेकून देऊन झाला पसार
Representational Image (Photo Credits: PTI)

हल्ली स्त्रिया, मुली सुरक्षित नाहीत याचा प्रत्यय येणारी उदाहरणे पावलोपावली घडत आहेत. मात्र आता लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे (Sexual Harassment) प्रमाणही वाढले आहे. परिस्थिती इतकी भयानक निर्माण झाली आहे की, लहान बाळेही या विकृत माणसांच्या नजरेतून सुटली नाहीत. असेच एका मामाने आपल्या दीड वर्षांच्या भाचीवर बलात्कार (Rape) करून, तिला झुडूपात फेकून दिल्याची घटना घडली आहे. सोमवारी ही पिडीत मुलगी आपल्या आईसोबत लग्नास आली असताना हा धक्कादायक प्रकार घडला.

ही दीड वर्षांची मुलगी आपल्या आईसह आग्रा या ठिकाणी एका लग्नात गेली होती. त्यावेळी तिच्या मामा तिला बाहेर घेऊन गेला. तब्बल तीन तास उलटले तरी मुलगी परत आली नाही म्हणून आईने मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी मंडपापासून जवळच असलेल्या काटेरी झुडपात ही चिमुरडी रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. (हेही वाचा: पोटच्या पोरीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या बापाला दिल्ली हायकोर्टाने सुनावली आजीवन कारावासाची शिक्षा)

बेशुद्ध असलेल्या या मुलीवर तिच्या मामाने निर्जनस्थळी नेवून बलात्कार केला होता, त्यानंतर तिला या काटेरी झुडूपात फेकून तो पसार झाला. या मुलीची अवस्था पाहून तिला ताबडतोब रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीदरम्यान या मुलीवर बलात्कार झाल्याचे आढळून आले. लग्नकार्यातील वातावरण विघडू नये म्हणून मंगळवारी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. आरोपीवर बलात्कार आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.