पोटच्या पोरीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या बापाला दिल्ली हायकोर्टाने सुनावली आजीवन कारावासाची शिक्षा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पोटच्या पोरीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला दिल्ली हायकोर्टाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच सुनावणी दरम्यान कोर्टाने सांगितले की, असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला माफी मिळणार नाही.

आरोपी बापावर आपल्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्यामुळे त्याची अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली होती. न्यायाधिश सिद्धार्थ मृदुल आणि मनोज के अहोरी यांच्या खंडपीठाने अल्पवयीन मुलीवर गेली चार वर्षे बापाने बलात्कार केले असल्याचे सांगितले आहे. तर पीडित मुलीची वैद्यकिय चाचणी आणि साक्षीदारांच्या वतीने आरोपीला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.(हेही वाचा-प्रियकरासोबत नवऱ्याने लावून दिले बायकोचे लग्न, भेट म्हणून मुलगासुद्धा पाठवून दिला)

तर वैद्यकिय चाचणी केलेल्या रिपोर्टमध्ये मुलगी आणि तिच्या वडिलांचे डीएनए एकसारखे असल्याचे दिसून आले. त्यामुळे कोर्टाने वैद्यकिय चाचणीच्या रिपोट्सला प्राधान्य देत आरोपीला कडक शिक्षा दिली आहे. तसेच आरोपी विरुद्ध कोणत्याही प्रकारची याचिका दाखल केल्यास ती स्विकारली जाणार नाही हे सुद्धा दिल्ली हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.