प्रियकरासोबत नवऱ्याने लावून दिले बायकोचे लग्न, भेट म्हणून मुलगासुद्धा पाठवून दिला
Marriage (Image used for representational purpose only)

चित्रपटात आपण असे पाहिले असेल जर एखाद्या विवाहीत जोडप्यात प्रियकर आल्यास त्याच्यावरुन किती वादाची भुमिका घेतली जाते. तसेच काही वेळेस सामंज्यस नवरा असल्यास तो आपल्या बायोकाला प्रियकराकडे जाण्यास आनंदाने परवानगी देतो. मात्र बिहार मध्ये सुद्धा चित्रपटातील प्रेमकथेसारखी घटना घडली आहे. एका नवऱ्याने आपल्या बायकोचे प्रियकरासोबत लग्न लावून दिले असून भेट म्हणून तिला दीड वर्षाचा मुलगा दिला आहे.

भागलपुर मधील सालेपुर येथील ही घटना आहे. एक तरुण आपली बायको आणि दीड वर्षाच्या मुलासोबक एका भाड्याच्या घरात राहतात. तर या दोघांच्या लग्नाला 4 वर्षे सुद्धा पूर्ण झाली आहेत. परंतु लग्नानंतर काही दिवसांनी नवऱ्याला तुरुंगात टाकण्यात आले होते. त्याचवेळी या महिलेचे भाड्याच्या घरात राहत असलेल्या मालकाच्या सोबत प्रेमसंबंध जुळले. या दोघांचे प्रेम एवढ्या स्तरावर पोहचले की, नवरा तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याला ही सर्व घटना कळली. त्यावेळी त्याने बायकोचे लग्न मालकाच्या मुलासोबत लावून देण्याचे ठरविले.(हेही वाचा-प्रेयसीचा अबोला; प्रियकराकडून तिच्या नाकाचा कडकडून चावा)

या लग्नाची चर्चा संपूर्ण गावात सुरु आहे. तर नवऱ्याने आपल्या बायकोचे लग्न पूर्ण रितीपद्धतीने प्रियकरासोबत लावून दिले. तसेच आपला पोटचा दीड वर्षाच्या मुलाला सुद्धा तिच्या सोबत राहण्याची परवानगी दिली आहे.