Uttar Pradesh Crime News: जमिनीचा हिस्सा देण्यास नकार दिल्याने आईची निर्घृण हत्या करून शिरच्छेद, युपीतील थरार घटना
Representational image (Photo Credit- IANS)

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील सीतापूर (Sitapur) जिल्ह्यात तरुणाने जमिनीच्या वादासाठी आईची हत्या (Murder) केली आहे. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना तळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेजापूर गावात घडली आहे. माहितीनुसार, आईने जमिनी हस्तांतरित करण्यास नकार दिल्याने मुलाने हे टोकाचे पाऊल उचलेले आहे. मद्यधुंद आरोपीने आईच शिरच्छेद केला आहे. शरिर धडापासून वेगळे केले आहे. या घटनेनंतर पोलिस देखील चक्रावले आहे. (हेही वाचा- जमिनीचा वाद पेटला, पाच मामांनी घेतला भाच्याचा जीव; बीड मधील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील हरिद्वारी गावातील दिनेश (35) या तरुनाने जमिनीचा हिस्सा न दिल्याने आईचा शिरच्छेद केला. तरुणाचे वडिल हरदवारी यांनी दिनेशची आई सरोजिनी (कमला देवी 65) यांच्या नावावर सहा बिघे जमीन खरेदी केली होती. त्यानंतर त्याच्या आईने 25 वर्षांपूर्वी याच गावातील छत्रपालशी लग्न केले होते. महिलेने आपले नाव बदलून कमला ठेवले. मुलगा दिनेश हा वडिलांनी खरेदी केलेल्या या जमिनीत समान वाटा मागत होता माज्ञ आईने हिस्सा देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात हे कृत्य केले. शनिवारी दुपारी कुऱ्हाडीने दिनेशने आईवर हल्ला केला आणि एका झटक्यात धड शरिरापासून वेगळे केले.

या घटनेची माहिती मिळताच, परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराबाहेरून सापडलेला डोकं नसलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिनेशने दारूच्या नशेत हत्या केल्याची माहिती दिली. आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरु आहे.