Sitapur Murder Case: उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीने कुटुंबातील 5 सदस्यांची हत्या केली आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. आरोपीने घरात आई, पत्नी आणि तीन मुलांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर स्वत: गोळी झाडून आयुष्य संपवले. या हत्याकांड प्रकरणी पोलिस पुढील कारवाई करत आहे. (हेही वाचा- बॉयफ्रेंड आणि सोशल मीडीयात ओळख झालेल्या तरूणाकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून 24 वर्षीय मुलीची इमारतीच्या गच्ची वरून उडी मारत आत्महत्या)
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने सुरुवातीला आईवर गोळी झाडली. त्यानंतर पत्नीवर हातोड्याने वार केले आणि अल्पवयीन मुलांना टेरेसवरून फेकले. ही घटना रामपूर मथुरा पोलिस स्टेशनच्या पाल्हापूर गावात घडली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केले. आरोपी 45 वर्षीय अनुराग सिंह हा मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचा पोलिसांनी माहिती दिली.
#WATCH | Uttar Pradesh | Sitapur SSP Chakresh Mishra says, "Today, Rampur police, in Mathura received information that a mentally ill person, named Anurag Singh aged 45 years, has allegedly killed 5 people from his family before shooting himself...Police and the FSL team are… pic.twitter.com/cs9pcsbXzv
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 11, 2024
पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी सील करण्यात आले आहे. पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी तपास करत आहेत. आरोपीची आई सावित्री देवी (65), पत्नी (40), मुलांचे वय 6, 9, आणि 12 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये शोक पसरला आहे