Cough Syrup (PC- Pixabay)

भारतीय कफ सिरप निर्यातदार कंपन्यांवर ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने कारवाईचा बडगा उगारला आहे. डीसीजीआय (DCGI) ने म्हटले आहे की, कप सिरप निर्यातीचे विद्यमान धोरण विनामुल्य असले तरी. जे कफ सिरप निर्यात करायचे असेल त्याची आगोदर योग्य परिमानाला असनुसरुन चाचणी व्हायला हवी. ज्या कंपन्या कफ सिरपची चाचणी करतील त्याच कंपन्यांचे कफ सिरप निर्यात करण्यास ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (Drugs Controller General of India) परवानगी देईल.

भारतीय बनावटीच्या कफ सिरपमुळे गांबिया आणि उझबेकिस्तानमध्ये अनुक्रमे 66 आणि 18 मुलांचा मृत्यू झाल्यामुळे भारताने आता 1 जूनपासून निर्यात करण्यापूर्वी कफ सिरपची चाचणी अनिवार्य केली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (Drugs Controller General of India) ने सरकारी प्रयोगशाळांना निर्यातीसाठी असलेल्या कफ सिरपच्या नमुन्यांची चाचणी “सर्वोच्च प्राधान्यावर” करण्याचे आणि लवकरात लवकर अहवाल जारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

कफ सिरप चाचणीसाठी केंद्राने काही प्रयोगशाळाही ठरवून दिल्या आहेत. त्या खालील प्रमाणे

केंद्र सरकारच्या प्रयोगशाळा

  • भारतीय फार्माकोपिया आयोग
  • प्रादेशिक औषध चाचणी प्रयोगशाळा (RDTL – चंदीगड)
  • केंद्रीय औषध प्रयोगशाळा (CDL – कोलकाता)
  • केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळा (CDTL – चेन्नई हैदराबाद, मुंबई)
  • RDTL (गुवाहाटी) आणि NABL (गुवाहाटी)
  • चाचणी आणि कॅलिब्रेशन प्रयोगशाळांसाठी राष्ट्रीय मान्यता मंडळ) राज्य सरकारांच्या औषध चाचणी प्रयोगशाळा.

डीसीजीआयने म्हटले आहे की, कफ सिरप उत्पादकांना निर्यातीसाठी पाठवण्यापूर्वी त्यांच्या साठ्याची सरकारी प्रयोगशाळेत चाचणी घेणे बंधनकारक करणारा आदेश केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने जारी केल्याने अनावश्यक विलंब टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. कफ सिरप निर्यातदारांना उत्पादनाची निर्यात करण्यापूर्वी सरकारी प्रयोगशाळेद्वारे जारी केलेल्या विश्लेषणाचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल, 1 जूनपासून प्रभावी, फॉरेन ट्रेड महासंचालनालयाने (DGFT) अधिसूचनेत म्हटले आहे. भारतीय कंपन्यांनी निर्यात केलेल्या कफ सिरपने परदेशात गुणवत्तेबाबत चिंता निर्माण केल्याच्या घटनांना प्रतिसाद म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.

भारत हा जागतिक स्तरावर जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा पुरवठादार आहे, विविध लसींच्या जागतिक मागणीच्या 50 टक्क्यांहून अधिक, यूएसमधील जेनेरिक मागणीच्या सुमारे 40 टक्के आणि यूकेमधील सर्व औषधांच्या सुमारे 25 टक्के पुरवतो. भारताने 2021-22 मध्ये USD 17 बिलियनच्या तुलनेत 2022-23 मध्ये USD 17.6 अब्ज किमतीच्या कफ सिरपची निर्यात केली. जागतिक स्तरावर, भारत औषध उत्पादनाच्या प्रमाणानुसार तिसरा आणि मूल्यानुसार 14 व्या क्रमांकावर आहे.