Coronavirus Vaccine Update: भारतात 2024 पर्यंत प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचणार कोरोनाची लस-SII
Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

Coronavirus Vaccine Update:  सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडिया (SII) चे सीईओ (CEO) आदर पूनावाला (Aadar Poonawala) यांनी असे म्हटले आहे की, 2024 पर्यंत भारतीय नागरिकांपर्यंत कोरोनाची लस पोहचण्याची शक्यता आहे. मीडिया सम्मेलनात बोलताना पूनावाला यांनी असे म्हटले की, ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेका कोविड19 लस पुढील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत आरोग्य कर्मचारी आणि वृद्धांपर्यंत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. मात्र सामान्य नागरिकांसाठी ती एप्रिल महिन्यापर्यंत मिळण्यास सुरुवात होईल.(COVID-19 Vaccine भारतामध्ये पुढील 4 महिन्यांत तयार असेल: केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केला विश्वास)

पूनावाला यांनी पुढे असे ही म्हटले की, याच्या आवश्यक डोसची किंमत 1 हजार असण्याची शक्यता आहे. जी सध्या त्याच्या अंतिम ट्रायल च्या रिजल्टवर निर्भर करते. तसेच 2024 पर्यंत भारतीयांना कोरोनाची लस उपलब्ध करुन दिली जाईल असे ही पूनावाला यांनी म्हटले आहे.(Oxford COVID-19 Vaccine सर्वसामान्यांसाठी एप्रिल 2021 पर्यंत 'या' किंमतीत उपलब्ध होईल; SII CEO अदर पुनावाला यांची माहिती)

तर प्रत्येक भारतीयाला कोरोनाची लस मिळण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन वर्ष लागू शकतात. मात्र यामध्ये पूर्तता ही समस्या येत असून त्याचसोबत गरजेनुसार बजेट योग्य व्यवस्था आणि मूलभूत पायाभूत सुविधा यांची आवश्यकता आहे. या सर्व गोष्टींव्यतिरिक्त लोकांच्या इच्छेवर सुद्धा निर्भर आहे की, त्यांना कोरोनाची लस लावून घ्यायची आहे की नाही.