Union Health Minister Dr. Harsh Vardhan (Photo Credits: PTI)

अमेरिकेमध्ये मॉडर्ना आणि फायझर या दोन्ही लसींचा तिसर्‍या टप्प्यातील अहवाल पाहता त्यांनी 90% वर त्यांच्या लसी कोविड 19 वर प्रभावी असल्याचा दावा केल्यानंतर आता भारतीयांच्या मनात स्वदेशी कोविड 19 वरील लसींबाबत उत्सुकता वाढली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लवकरात लवकर लस अशी प्रार्थना करणार्‍या अनेकांसाठी आज आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Dr Harsh Vardhan) यांनी गूडन्यूज दिली आहे. भारतामध्ये येत्या 3-4 महिन्यात लस असेल याबद्दल मला विश्वास आहे असे मत त्यांनी जाहीरपणे व्यक्त केले आहे.

'The Shifting Healthcare Paradigm During and Post-Covid' या FICCI FLO webinar दरम्यान चर्चासत्रामध्ये बोलताना त्यांनी कोविड 19 लसीबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान देशातील 135 कोटी जनतेला सारखीच लस देण्याला आमचं प्राधान्य असेल असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. आता MBBS/BDS मध्ये COVID Warriors च्या मुलांसाठी जागा राखीव; आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची मोठी घोषणा.

ANI Tweet

लस देताना प्राधान्य कुणाला द्यावं हे सायंटिफिक डाटा पाहूनच ठरवले जाणार आहे. आरोग्य कर्मचारी आणि कोरोना वॉरियर्स हे सहाजिकच पाहिली पसंत असतील. त्यापाठोपाठ वयोवृद्ध आणि अन्य आजार, कोमॉर्बिडिटी असणार्‍या रूग्णांना लस उपलब्ध करून दिली जाईल असे सांगण्यात आले आहे.

2021 हे वर्ष आपल्या सार्‍यांसाठी चांगलं असेल. सध्या ई वॅक्सिन इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म बनवण्यात आले असून त्यांच्याद्वारा ब्लू प्रिंटवर काम सुरू आहे. अशी माहिती त्यांनी बोलताना दिली आहे. दरम्यान काही महिन्यांत केंद्र सरकार सोबत राज्य सरकारनेही कोविड 19 रोखण्यामध्ये उचललेली महत्त्वाची पावलं कौतुकास्पद असल्याचं सांगत त्यांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं व्हिजन पाहता केंद्र सरकार 2022 साली एक नवा भारत घदवेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.