कोविड विषाणू लसीचे (Coronavirus Vaccine) दुसरे ड्राय रन (Dry Run) 8 जानेवारी रोजी देशभरातील सर्व जिल्ह्यांत होणार आहे. देशातील 4 राज्यांतील काही ठिकाणीच लसीकरणासाठी पहिले ड्राई रन, 28 आणि 29 डिसेंबर रोजी घेण्यात आले होते. यानंतर, 2 जानेवारी रोजी संपूर्ण देशातील पहिला ड्राई रन सर्व राज्यांच्या काही जिल्ह्यात झाला. आता 8 जानेवारी रोजी होणारे ड्राय रन देशातील सर्व राज्यांतील सर्व जिल्ह्यांमध्ये असेल. ही ड्राय रन अशा वेळी केली जाईल, जेव्हा 3 जानेवारी रोजी डीसीजीआयने भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ आणि ऑक्सफोर्डच्या ‘कोव्हिशिल्ड’ या दोन कोरोना लस वापरण्यास तातडीची मान्यता दिली आहे.
देशात कोविड लस कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक होईल. गुरुवारी दुपारी साडे बारा वाजता बैठक बोलविण्यात आली आहे. शनिवारी, 2 जानेवारी रोजी कोविड लसीचे ड्राय रन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 125 जिल्ह्यांतील 286 साइटवर झाले होते. आता 8 जानेवारी रोजीचे ड्राय रन सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व जिल्ह्यांत असेल. पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेशात ड्राय रनचे सकारात्मक निकाल समोर आल्यांनतर सरकारने देशभरात ड्राई रन करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी मोठी घोषणा करत सांगितले की, भारतात पहिली कोरोना व्हायरस लस 13 जानेवारीला दिली जाऊ शकते. ड्राय रनच्या रिझल्ट्सच्या आधारे आरोग्य मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. भूषण यांनी म्हटले आहे की, एमरजंसी यूझ ऑथोरायझेशन झाल्यापासून दहा दिवसांच्या आत लसीकरण सुरू करण्याची तयारी पूर्ण आहे. (हेही वाचा: देशात 13 जानेवारी रोजी दिला जाऊ शकतो कोरोना विषाणू लसीचा पहिला डोस; आरोग्य सचिव राजेश भूषण यांची माहिती)
केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात एक कोटी आरोग्य कर्मचारी आणि दोन कोटी फ्रंटलाईन कर्मचार्यांसह अतिरीक्त प्राधान्य असणार्या लोकांना मोफत लस उपलब्ध करुन देण्यात येईल. पुढे प्राधान्याच्या आधारे जुलै पर्यंत 27 दशलक्ष लोकांना लसी दिली जाईल,