कोरोना विषाणूवर (Coronavirus) नियंत्रण मिळवण्यासाठी सुरु झालेल्या लसीकरण (Vaccination) मोहिमेला यश आलेले दिसत आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने याबाबत माहिती दिली आहे. देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा झाली आहे. दरम्यान, अशी अनेक प्रकरणेही समोर येत आहेत ज्यात लसीकरणानंतरही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सरकारने आता अशा संक्रमणाची परिस्थिती स्पष्ट केली आहे. आयसीएमआरने बुधवारी सांगितले की, लसीकरणानंतर 10,000 पैकी केवळ 2-4 लोकांनाच कोरोनाची लागण झाली आहे.
आयसीएमआरचे महासंचालक बलाराम भार्गव म्हणाले की, कोव्हॅक्सिनचा (Covaxin) दुसरा डोस 17,37,178 व्यक्तींनी घेतला होता, त्यापैकी 0.04 टक्के लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. 0.04 टक्के म्हणजे 1000 मधील चार लोक. त्याच वेळी, कोव्हिशिल्डचा (Covishield) दुसरा डोस घेतला असलेल्या 1,57,32,754 लोकांपैकी 0.057 टक्के लोकांना विषाणूची लागण झाली आहे. भार्गव म्हणाले की, लस ही संसर्गाची जोखीम कमी करते आणि मृत्यू व गंभीर संक्रमण टाळते. लसीकरणानंतर आपल्याला संसर्ग झाल्यास त्यास ‘ब्रेक थ्रू इन्फेक्शन’ असे म्हणतात, असेही भार्गव यांनी सांगितले.
आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, 11 दशलक्ष कोव्हॅक्सिन डोस वापरण्यात आले आहेत, ज्यात 93,56,436 लोकांनी लसचा पहिला डोस घेतला आहे. पहिल्या डोसनंतर 4,208 (0.04%) लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्याचवेळी 17,37,178 लोकांनी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला, त्यापैकी 695 (0.04%) लोक संक्रमित झाले.
कोव्हॅक्सिन व्यतिरिक्त कोव्हिशिल्डचे 11.6 दशलक्ष डोस देण्यात आले. यापैकी 10,03,02,745 लोकांनी पहिला डोस घेतला, ज्यानंतर 17145 (0.03%) लोक संक्रमित झाले. त्यानंतर दुसरा डोस 1,57,32,754 लोकांनी घेतला, त्यापैकी 5,014 (0.03%) संक्रमित झाले. (हेही वाचा: 18 वर्षांवरील नागरिकांसाठी 28 एप्रिलपासून सुरू होतयं रजिस्ट्रेशन; इथे पहा आवश्यक डॉक्युमेंट्स, शुल्क, CoWIN Portal वर कशी कराल नोंदणी)
झी न्यूजच्या वृत्तानुसार, नीती आयोगाचे आरोग्य सदस्य व्हीके पॉल यांनी म्हटले आहे की, लसीकरणानंतरही लोक संसर्गित झाले तरी त्यांची स्थिती गंभीर नसते. आरोग्य तज्ञाच्या मते, लसचा दुसरा डोस घेतल्यानंतर 10 ते 15 दिवसांच्या आत, व्यक्तीमध्ये पुरेशी अँटीबॉडी तयार केली जातात.