COVID-19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus ) संसर्ग कमी करण्यासाठी देशभरातील सर्वच राज्यांची सरकारे आणि केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. अशात कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट येऊन गेली आहे. सध्या कोरोना व्हायरस प्रादुर्भाव काहीशा स्थिर पातळीवर असल्याचे दिसते. असे असले तरी कोरोना महामारीच्या (COVID-19 Pandemic ) संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत मात्र जोरदार चर्चा आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्य सरकारं कामालाही लागली आहेत. त्यामुळे खरोखरच कोरोनाची तिसरी लाट आली आहे काय? असा उत्सुकताजनक प्रश्न उपस्थित केला जातो आहे. देशात आज (मंगळवार, 31 ऑगस्ट) पाठिमागील 24 तासात कोरोनाचे 30,941 रुग्ण आढळल्याची नोंद असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटले आहे. त्यामुळे देशात कोरोनाची खरोखरीच तिसरी लाट निर्माण झाली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे के एपिडिमियोलॉजी एंड कम्‍यूनिकेबल डिसीजेज विभागाचे प्रमुख डॉ. समिरन पांडा (Dr Samiran Panda) यांनी म्हटले आहे की, ज्या राज्यांमध्ये कोरोन व्हायरस संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत फारशी भयावह स्थिती दिसली नाही त्या राज्यांमध्ये कोरोना व्हायरस संसर्ग वाढताना दिसत आहे. ही सर्व तिसऱ्या लाटेची लक्षणे आहेत. डॉ. समिरन पांडा यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, देशातील कोरोना व्हायरस संक्रमनाची तिसरी लाट वेगवेळ्या राजयांत वेगवेगळ्या स्वरुपात दिसू शकते. (हेही वाचा, COVID 19 Fresh Guidelines For Mumbai: मुंबई मध्ये 5 पेक्षा अधिक रूग्ण एका इमारतीत आढळल्यास बिल्डिंग होणार सील; नव्या गाईडलाईन जारी)

महाराष्ट्र आणि दिल्ली यांसारख्या राज्यांपासून धडा घेत कोरोना निर्बंध आणि लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यात आले होते. त्यामुळे देशात दुसऱ्या लाटेची तीव्रता म्हणावी तितकी जाणवली नाही. मात्र, आता कोरोनाची तिसरी लाट मात्र मोठ्या प्रमाणावर येऊ शकते अशी चिन्हे आहेत. तज्ज्ञांचे म्हणने असे की, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर COVID-19 ची लाट उच्चांक गाठू शकते. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट काहीशी कमी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, कोरोना व्हायरस महामारीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सज्ज आहे. आम्ही वैद्यकीय क्षेत्रातील सर्व रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ऑक्सिजन सज्जताही वाढविण्यात आली आहे.

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी म्हटले की, दिल्ली सरकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासठी पूर्ण तयारी करत आहे. आम्ही 37,000 बेडची उपलब्धता ठेवली आहे. यात 12,000 ICU बेडचा समावेश असेल असेही सत्येंद्र जैन यांनी म्हटले आहे.