K S Dhatwalia | (Photo Credits-ANI)

माहिती आणि सूचना प्रसारमण मंत्रालय (Press Information Bureau) महासंचालक के. एस. धतलिया (K S Dhatwalia) यांची कोरोना व्हायरस चाचणी (Coronavirus) पॉझिटीव्ह आली आहे. त्यांनाच एम्स रुग्णालयात दाखर करण्यात आले आहे. वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. धतवालिया सायंकाळी 7 वाजता एम्स येथील ट्रॉमा सेंटर येथे दाखल करण्यात आले. ट्रॉमा सेंटर येथे कोविड 19 रुग्णांवर उपचार केले जात आहेत. दरम्यान, धतवालिया यांच्या प्रकृतिबाबात अधिकृतपणे अद्यापही कोणती प्रतिक्रिया अधवा माहिती पुढे आली नाही.

सूत्रांच्या हवाल्याने वृत्त देताना पीटीआयने म्हटले आहे की, राष्ट्रीय मीडिया केंद्र (एनएमसी) बंद करण्यात आले आहे. एनएमसी मध्येच धतवालिया यांचे कार्यालय आहे. हे कार्यालय आजही ( सोमवार) बंद राहणार आहेत. आज ही इमारत आणि परिसर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात येईल. (हेही वाचा, UP मधील शिक्षिकेचा प्रताप; एकाचवेळी तब्बल 25 शाळांमध्ये शिकवून वर्षाला कमावले 1 कोटी रुपये )

वृत्तात पुढे म्हटले आहे की, एनएमसी कार्यालय मंगळारीही बंद राहण्याची शक्यता आहे. कारण, धतवालिया यांच्या संपर्कात आलेले कर्मचारी आणि इतर नागरिकांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहित राबविण्यात येत आहे सूत्रांनी सांगितले की एनएमसी पूर्णपणे संक्रमनमुक्त होईपर्यंत पत्रकार परिषद आणि इतर कामे शास्त्री भवन येथे आयोजित केले जातील. धतवालिया यांनी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि प्रकाश जावडेकर यांनी एकत्र येत मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती.