Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसने भारत देशात आणखी एक बळी घेतला आहे. गुजरात मधील अहमदाबाद येथील 45 वर्षीय कोरोनाग्रसत व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या कोरोनाग्रस्त रुग्णाला मधुमेहाचा आजारही होता. या मृत्यूसह गुजरातमध्ये कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या आता 5 झाली असल्याची माहिती गुजरातच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर मृत्यूने देशात कोरोना व्हायरसच्या एकूण 25 रुग्णांचा बळी गेला आहे. भारत देशात कोरोनाचे एकूण 979 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 86 जण पूर्णपणे बरे झाले आहेत.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या नागरिकांना चिंतेत टाकत असून सरकार समोरील आव्हान वाढवत आहे. कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे देश 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी देखील सरकारकडून देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्यास नक्कीच मदत होईल. (Coronavirus in Maharashtra: मुंबई, पुणे, सांगली, नागपूर येथील 7 नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 193)

ANI Tweet:

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घाबरुन न जाता सूचनांचे पालन करावे. कारण कोरोनाचे काही रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर मोदी आज 'मन की बात'मधून काय सांगणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.