Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे 7 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी  मुंबई (Mumbai) 4, पुणे (Pune) 2 आणि सांगली (Sangli), नागपूर (Nagpur) येथे  प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या एकूण 193 झाली आहे. देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेले महाराष्ट्र राज्य आहे. त्यामुळे राज्य सरकार विशेष खबरदारीसह विविध नियमांची अंमलबजावणी करत आहे. राज्यातील रुग्णांचे आकडे भीती वाढवणारे असले तरी काही सकारात्मक चित्रही समोर येत आहे. पुण्यातील 5 कोरोनाग्रस्त रुग्ण आता पूर्णपणे बरे झाले आहेत. पुन्हा केलेल्या चाचणीत त्यांचे रिपोर्ट्स निगेटीव्ही आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी दिली आहे.

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 979 झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोरोना व्हायरच्या वाढता धोका विचारात घेता संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. तसंच लॉकडाऊनचे नियम पाळण्याच्या सूचना नागरिकांना वारंवार दिल्या जात आहेत. तसंच कोरोनाच्या या गंभीर परिस्थितीत मदतीसाठी सरकारकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत घाबरुन न जाता तुम्ही हेल्पलाईन नंबर मदत मागू शकता. (कोरोना व्हायरस हेल्पलाईन नंबर; देशभरातील राज्यांसह पाहा तुमच्या राज्याचा Coronavirus Helpline Number)

ANI Tweet:

कोरोना सारख्या गंभीर संकटाचा सामना करण्यासाठी नियम पाळून सरकारला सहकार्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की  बात'मधून देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी आज काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.