देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचा उद्रेक सुरुच आहे. गेल्या काही दिवासांपासून कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मागील 24 तासांत देशात 90,123 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले असून 1,290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या वाढीमुळे भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 50 लाखांच्या पार गेला आहे. 50,20,360 इतक्या कोरोना बाधित रुग्णांची देशात आतापर्यंत नोंद झाली आहे. त्यापैकी 9,95,933 सक्रीय रुग्णांवर (Active Cases) उपचार सुरु आहेत. तर 39,42,361 रुग्णांची प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान देशात 82,066 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून (Ministry of Health & Family Welfare) देण्यात आली आहे.
देशातील कोरोना बाधितांचा वाढता आकडा चिंताजनक आहे. मात्र कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्याही चांगली आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट सुधारत असून मृत्यू दरातही घट होत आहे. दरम्यान, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक आहे.
ANI Tweet:
India's #COVID19 case tally crosses 50-lakh mark with a spike of 90,123 new cases & 1,290 deaths in last 24 hours.
The total case tally stands at 50,20,360 including 9,95,933 active cases, 39,42,361 cured/discharged/migrated & 82,066 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/94CuzPAAUi
— ANI (@ANI) September 16, 2020
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अक्राळविक्राळ रुप धारण करु लागल्याने नागरिकांची चिंता वाढली असून प्रशासनवरील जबाबदारीही दुणावली आहे. त्यामुळे विविध उपाय योजनांचा आधार घेत कोविड-19 ला अटकाव करण्याचा प्रयत्न सरकारसह आरोग्य यंत्रणा करत आहेत. राज्यातही कालपासून 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अभियानाला सुरुवात झाली आहे. (COVID-19 Vaccine Update: भारतामध्ये Serum Institute ला Oxford-AstraZeneca च्या लसीच्या पुन्हा मानवी चाचणी सुरू करायला DCGI कडून परवानगी)
कोरोनावर लस किंवा औषध उपलब्ध नसल्याने कोविड-19 वर नियंत्रण मिळवणे अवघड आहे. त्यामुळे त्यावरील लसीच्या विकासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भारतामध्ये Oxford-AstraZeneca च्या लसीची मानवी चाचणी पुन्हा सुरु करण्यास सीरम इन्सिट्युटला DCGI कडून परवानगी मिळाली आहे. युकेमधील क्लिनिकल ट्रायल्सच्या स्थगितीनंतर सीरम इन्सिट्युटनेही चाचण्या थांबवाव्यात असे आदेश DCGI ने दिले होते. मात्र युकेमधील चाचण्या पुन्हा सुरु झाल्यानंतर सीरम इन्सिट्युटलाही परवानगी देण्यात आली आहे.