Medicines (Photo Credits: Pixabay)

चीनमध्ये पसरत असलेला धोकादायक आणि प्राणघातक कोरोनाव्हायरस (Coronavirus) मानवांवर तसेच व्यवसायांवरही वाईट परिणाम करीत आहे. एक-एक करून वेगवेगळी क्षेत्रे त्याला त्याला बळी पडत आहेत. यामुळे भारतासारख्या देशांना नवीन समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वस्तुतः कोरोना व्हायरसमुळे भारतात चीनमधून आयात होणाऱ्या सर्व बाबींवर परिणाम होत आहे. कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चीनमधील अनेक कारखाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

या गोष्टीचा भारतातील वाहन क्षेत्र आणि स्मार्टफोन क्षेत्रावर परिणाम होत आहे. आता पुढील नंबर औषधांचा (Medicine) आहे. भारतात दररोज वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या औषधांच्या किंमती 70 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

औषधांच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे, ज्यामुळे त्यांचे दर वाढत आहेत. देशात सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या पॅरासिटामोलच्या (Paracetamol) किंमतीत 40% वाढ झाली आहे. बॅक्टेरियामुळे घसा, दात आणि कानाच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या अ‍ॅझिथ्रोमाइसिनची किंमत 70 टक्क्यांनी वाढली आहे. भारतीय औषध उत्पादकांच्या मते, पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा पुरवठा पुन्हा सुरू न केल्यास, एप्रिल महिन्यात फार्मा उद्योगास औषध निर्मितीच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. याचा अर्थ असा आहे की या किंमती आणखी वाढू शकतात. (हेही वाचा: Coronavirus: कोरोना रुग्णांवर उपचार करताना व्हायरसची लागण होऊन डॉक्टरांचा मृत्यू)

कोरोनाव्हायरसमुळे चीनमध्ये हजारो लोकांनी जीव गमावला आहे, परंतु त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर अनेक प्रकारे होत आहे. 2017-18 मध्ये भारताने चीनकडून 55 अब्ज डॉलर्स किमतीची इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात केली. फायनान्शियल टाईम्सच्या अहवालानुसार, सरकारी आकडेवारीनुसार, 2015  मधील 6 दशलक्ष युनिट्सच्या तुलनेत 2017-18 मध्ये सेल्युलर मोबाइल हँडसेटचे उत्पादन 22.5 दशलक्ष युनिटपर्यंत पोचले आहे. या उत्पादनात चीनमधून आयातित इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरल्या जातात, ज्यावर आता परिणाम झाला आहे.