Union Health Minister Dr. Harsh Vardhan (Photo Credits: PTI)

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) यांनी आज कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या (Lockdown) निर्णयाचे कौतुक केले आहे. लॉकडाउन हे कोरोना संकटकाळात एक प्रभावी सामाजिक लस म्हणून काम करत आहे. यामुळेच कोरोनाच्या रुग्णसंख्येत दुप्पटीने वाढ होण्याचा कालावधी 13 दिवसाच्या वर गेला आहे. लॉकडाउन लागू होण्यापूर्वी कोरोनाच्या रुग्णांचा Doubling Rate हा 3 ते 4 दिवस इतका होता मात्र आता या कालावधीत वाढ झाली आहे. भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याच्या प्रारंभीच्या काळात लॉकडाउन सुरु करण्यात आले परिणामी परिस्थिती आता नियंत्रणात आहे, यासाठी सरकारचे कौतुक करायलाच हवे असेही डॉ, हर्षवर्धन यांनी म्हंटले आहे.  कोरोना व्हायरसचे सर्व अपडेटस जाणुन घेण्यासाठी क्लिक करा.

डॉ हर्षवर्धन यांनी म्हंटल्याप्रमाणे इतर अनेक विकसित देशांनी लॉकडाउन लागू करण्यासाठी बराच अवधी घेतला होता, अनेक ठिकाणी लॉकडाउन हे अर्धवट लागू करण्यात आले होते यामुळे बरेच महत्वाचे आणि सुरुवातीचे दिवस वाया गेले आणि त्याचा परिणाम आता जगभरात कोरोनाच्या लाखो रुग्णांच्या रूपात दिसून येत आहे. मात्र भारतात सुरुवातीलाच निर्णय घेण्यात आला होता.

ANI ट्विट

दरम्यान, भारतात सद्य घडीला रुग्णांची एकूण संख्या 1,31,868 वर पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 3867 वर पोहोचला आहे. सद्य स्थितीत देशात 73,560 रुग्णांवर उपचार सुरु असून 54,441 रुग्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिली आहे.