Corona Vaccine: केंद्र सरकारकडून लसीकरणासाठी नव्या गाइडलाइन्स जाहीर
COVID-19 Vaccine (Photo Credits: IANS)

Corona Vaccine: केंद्र सरकाराने लसीकरणासंबंधित नव्या गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत. त्यानुसार संक्रमित झालेल्या नागरिकांना लसीकरणासाठी तीन महिन्यापर्यंत वाट पहावी लागणार असल्याचे म्हटले आहे. मात्र यामध्ये सावधिगिरीसाठी सुद्धा औषध दिले जाणार आहे. सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पाठवण्यात आलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव विकास शील यांनी म्हटले की, ज्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांना तीन महिन्यानंतर लस देण्यात यावी. त्यामुळे सर्वांनी याचे पालन करण्याचे आवाहन ही त्यांनी केले आहे.(Life Insurance आणि General Insurance मध्ये 'हा' आहे मोठा फरक; जाणून घ्या सविस्तर)

खरंतर कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉननंतर पुन्हा एकदा देशात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सरकारकडून काही माध्यमांमातून जागृकता निर्माण केली जात आहे. अशातच लोकांच्या मनात लसीकरण किंवा कोरोना झाल्यानंतर कधी लस घ्यायची असे प्रश्न निर्माण होत आहेत. या व्यतिरिक्त किती महिन्यापर्यंत इम्युनिटी म्हणजेच अँन्टी बॉडीज शरिरात राहतात. याबद्दलची उत्तरे आयसीएमआरचे डीजी बलराम भार्गव यांनी माहिती दिली आहे.(Co-WIN येथे कोरोनावरील लस घेण्यासाठीएकाच मोबाइल क्रमांकावरुन 4 ऐवजी 6 जणांना रजिस्ट्रेशन करता येणार)

बलराम भार्गव यांनी असे म्हटले की, कोरोना झाल्यानंतर किंवा लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर जवळजवळ 9 महिन्यापर्यंत अँन्टी बॉडीज शरिरात राहतात. लसीकरणाच्या रोगप्रतिकारक क्षमतेबद्दल  भारतात आणि जगभरात अभ्यास करण्यात आला. यामध्ये असे दिसून आले की, अँन्टी बॉडीज 9 महिन्यापर्यंत राहतात.