INDIA Alliance Meeting: मल्लिकार्जुन खडगे यांनी फेटाळला प्रस्ताव; 'इंडिया' आघाडी बैठकीत पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यावर चर्चा
Mallikarjun Kharge (Photo Credits: PTI/X)

विरोधी पक्षांनी राष्ट्रीय पातळीवर स्थापन केलेल्या 'इंडिया' (INDIA Alliance Meeting) आघाडीची एक महत्त्वाची बैठक आज (19 डिसेंबर) दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. खास करुन पंतप्रधान पदाचा चेहरा. प्राप्त माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खडगे (Mallikarjun Kharge) यांना पंतप्रधान पदाचा चेहरा बनवावे, असा प्रस्ताव आला होता. मात्र, स्वत: खडगे यांनीच तो नाकारला आहे. त्यामुळे आता इंडिया आघाडीकडून कोणत्या चेहऱ्याला पुढे केले जाते का? याबाबत उत्सुकता आहे. उल्लेखनीय असे की, राहुल गांधी हे आघाडीकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून स्पर्धेत नसल्याचे समजते.

ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्याकडून प्रस्ताव

इंडिया आघाडी पक्षांच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून खर्गे यांचे नाव सूचवले. मात्र, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भारत ब्लॉकच्या बैठकीतील प्रस्तावांना उत्तर देताना 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्यास नकार दिला. स्वत: खडगे यांनी नमूद केले की, आम्ही लोकसभा निवडणूक 2024 मध्ये जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करु. त्यानंतर पंतप्रधान पदाचा चेहरा सर्वानुमते निवडू. (हेही वाचा, INDIA Alliance Meeting: 'इंडिया' आघाडीच्या बैठकीस दिल्ली येथे सुरुवात, पंतप्रधान पदाचा चेहरा ठरणार? (Watch Video))

मल्लिकार्जून खडगे यांच्याकडून जिंकण्यावर भर

खडगे यांनी आपल्या निवेदनात त्यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या अधिकाधिक जागा जिंकण्यावर भर दिला. ते म्हणाले, प्रथम आपणा सर्वांना जिंकायचे आहे. विजयासाठी काय करावे लागेल याचा विचार केला पाहिजे. पंतप्रधान कोण होणार, हे नंतर ठरवले जाईल. जर कमी खासदार असतील तर. पंतप्रधानांबद्दल बोलण्यात काय अर्थ आहे. प्रथम, आमची संख्या वाढवण्यासाठी एकत्र येऊन, आम्ही बहुमत आणण्याचा प्रयत्न करू. (हेही वाचा, Kalyan Banerjee Mimics Jagdeep Dhankhar: खासदारांकडून राज्यसभा सभापतींची नक्कल, राहुल गांधी यांनी केले चित्रीकरण (Watch Video))

केसी वेणुगोपाल यांची सूचक सूचना

इंडिया आघाडीच्या दिल्ली येथे झालेल्या बैठकीत 28 राजकीय पक्षांनी हजेरी लावली. आघाडीची ही चौथी बैठक होती. या बैठकीत काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी तत्काळ जागा वाटपासाठी चर्चेचे आवाहन केले आणि "संयुक्त रॅली" प्रस्तावित कराव्यात असेही म्हटले. केंद्र सरकार हुकुमशाही करत आहे. संसदेमध्ये दररोज गटागटाने खासदार निलंबीत करत आहेत. त्यामुळे आगोदरच संतपालेल्या विरोधकांनी आगामी लोकसभा 2024 मध्ये एनडीएच्या विरोधात जोरदार आघाडी उघडण्यासाठी सूत्रबद्धपद्धतीने काम करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.

या बैकीस काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खडगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, लालू प्रसाद यादव, नितीश कुमार, तेजस्वी यादव, फारुक अब्दुल्ला, सिताराम येच्युरी, स्टॅलीन, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, संजय राऊत, राखव चढ्ढा यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. या आधी आघाडीच्या तीन बैठका पार पडल्या आहेत. मात्र, या सर्व बैठकांमपैकी आजची बैठक वेगळी ठरणयाची शक्यता व्यक्त केली जात आहे.