INDIA Alliance Meeting | (Photo Credit - X)

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणाचा अपवाद वगळता झालेल्या दणदणीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने 'इंडिया' आघाडीची (INDIA Alliance Meeting in Delhi) बैठक बोलावली आहे. ही बैठक राजधानी दिल्ली येथे पार पडत आहे. या बैठकीस काँग्रेस (Congress), टीएमसी, शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), समाजवादी पार्टी (Samajwadi Party), सीपीआय (एम) (CPI-M)), आप (AAP) आणि पीडीपी (PDP ) आरजेडी (RJD), जेडीयु (JDU) यांच्यासह जवळपास 28 पक्षाचे प्रमुख अथवा प्रतिनिधी उपस्थित आहेत. आगामी लोकसभा निवडणूक आणि त्याअनुशंघाने प्रचाराची रूपरेषा आखण्यासाठी, जागावाटप व्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी आणि भाजपला विरोध करण्यासाठी नेमके धोरण ठरविण्यासाठी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

इंडिया आघाडीची चौथी बैठक

इंडिया आघाडीची ही बैठक दिल्ली येथील अशोका हॉटेलमध्ये आज (मंगळवार, 19 डिसेंबर) दुपारी 3 वाजलेपासून सुरु झाली आहे. या बैठकीचा एक व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयनेही आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. इंडिया आघाडीहीची आज पार पडत असलेली ही चौथी बैठक आहे. या आधीच्या बैठका या, पाटणा ( 23 जून), बेंगळुरू (17-18 जुलै) आणि मुंबई (31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर) येथे पार पडल्या आहेत. (हेही वाचा, Kalyan Banerjee Mimics Jagdeep Dhankhar: खासदारांकडून राज्यसभा सभापतींची नक्कल, राहुल गांधी यांनी केले चित्रीकरण (Watch Video))

पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित होणार?

आजच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला आव्हान देण्यासाठी युतीमधील नेते प्रभावी रणनीतींवर विचार होण्याची शक्यता आहे. बैठकीपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, टीएमसी सुप्रीमो यांनी सांगितले की, 2024 च्या निवडणुकीनंतर ब्लॉकचा पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केला जाईल. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना युतीचा चेहरा असल्याचे सांगत एक पोस्टर झळकले होते. त्यामुळे पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

व्हिडिओ

दरम्यान, या बैकीस काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खडगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, लालू प्रसाद यादव, नितीश कुमार, तेजस्वी यादव, फारुक अब्दुल्ला, सिताराम येच्युरी, स्टॅलीन, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, संजय राऊत, राखव चढ्ढा यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. या आधी आघाडीच्या तीन बैठका पार पडल्या आहेत. मात्र, या सर्व बैठकांमपैकी आजची बैठक वेगळी ठरणयाची शक्यता व्यक्त केली जात आहे.