Jitin Prasada, Nitin Raut | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

आरक्षणाचा मुद्दा देशाला नवा नाही. सध्या तर महाराष्ट्र आणि देशभरात आरक्षण (Reservation) हा विषय चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयातही आरक्षणावरुन दावे-प्रतिदावे सुरु आहेत. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचे दोन नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. नितीन राऊत (Nitin Raut) आणि जतिन प्रसाद (Jitin Prasada) असे अशी या दोन नेत्यांची नावे आहेत. नितीन राऊत यांनी श्राद्ध, मंदिर, विवाह या विषयांमध्ये विशिष्ट वर्गाचे प्राबल्य असल्याचे म्हटले. या क्षेत्रातील आरक्षण कधी संपेल असा सवालही विचारला. नितीन राऊत यांचे ट्विट पाहून काँग्रेसचेच नेते जतिन प्रसाद यांनी रिट्विट केले. या दोन्ही नेत्यांमध्ये ट्विटरवर चांगलीच खडाजंगी (Nitin Raut Vs Jitin Prasada) पाहायला मिळते आहे.

अॅड. नितीन राऊत यांनी काय म्हटले?

श्राद्धापासून ते मंदिरापर्यंत एकाच वर्गाचे असलेले आरक्षण कधी संपणार? दानावही असलेला एकाच वर्गाचे आरक्षण कधी संपणार? दलित मास्टर साहेबांना सार्वजनिक समारंभात सोबत जेवण कधी मिळणार? दलितांना घोड्यावर बसताना येणारे अडथळे कधी दूर होणार? या प्रश्नांचे उत्तरही कधीतरी मिळावे, असे नितीन राऊत यांनी आपल्या ट्विटमधून विचारले आहेत. तसेच, #मंदिरो_में_आरक्षण_कबतक हा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. (हेही वाचा, Bharat Ratna: सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले यांना भारतरत्न देण्यात यावा; पुणे महापालिकेत ठराव मंजूर)

पुढच्या ट्विटमध्ये नितीन राऊत म्हणतात, भारताच्या लोकसंख्येत OBC लोकसंख्या 52% आहे. परंतू, या वर्गाचे सर्वोच्च न्यायालयात 6% न्यायाधीश आहेत. देशात SC लोकसंख्या 14% आहे. परंतू, न्यायाधीश केवळ 3% आहेत. मुस्लिम लोकसंख्या 17% परंतू न्यायाधीश केवळ 3% अनुसूचित जनजातींची लोकसंख्या 9% परंतू न्यायाधीश एकही नाही. परंतू, एका वर्गाची लोकसंख्या 3% आहे. परंतू, न्यायाधीश मात्र 40% आहेत.

जतिन प्रसाद यांनी काय म्हटले?

नितीन राऊत यांचे ट्विट रिट्विट करत जतिन प्रसाद यांनी म्हटले आहे की, ब्राह्मण समाज कधीही व्यवस्थेवर नियंत्रण मिळवू इच्छित नाही. तो आजही आपले कर्तव्य पार पाडतो आहे जी अनादीकाळापासून प्रदान करण्यात आली आहे. ब्रह्म समाज सर्वांप्रति समान दृष्टीकोण ठेवतो.