Dr Harsh Vardhan | (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरस वर ठोस औषधे उपचार उपलब्ध नसल्याने कोरोना विषाणूंचा फैलाव रोखणे कठीण होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणित वाढत आहे. अशातच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सकारात्मक माहिती दिली आहे. कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी किंवा प्रतिबंध करण्यासाठी आयुष मेडिसिन्सच्या क्लिनिकल ट्रायल्स सुरु झाल्या आहेत. आरोग्य सेवकांवर या चाचण्या केल्या जात आहेत. विशेषत: कोरोना रुग्णांची संख्या अधिक असलेल्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्यांना कर्मचाऱ्यांवर या टेस्टचा प्रयोग करण्यात येत आहे.

संपूर्ण जग कोरोना विरुद्ध लढत असताना भारताने टाकलेले हे पाऊल ऐतिहासिक आहे. अश्वगंधा, याष्टीमाधू, गुडुचि पिपाळी, आयुष-64 यांसारख्या औषधांची क्लिनिकल ट्रायल सुरु करण्यात आली. आजपासून याची सुरुवात आरोग्य सेवक तसेच कोरोनाचा संसर्ग अधिक असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्यांवर करण्यात आला आहे. असे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. तसंच आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह हर्षवर्धन यांनी कोविड 19 च्या परिस्थितीत आयुष आधारित तीन अहवाल सादर केले. (डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ यांच्यासोबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा संवाद म्हणाले, 'तुमच्या योगदानाबद्दल देशाला अभिमान आहे')

हे अहवाल आयुष मंत्रालय, आरोग्य मंत्रालय आणि सायन्स अॅन्ड टेक्नोलॉजी मंत्रालय यांनी संयुक्तपणे तयार करण्यात आला असून तो Council of Scientific & Industrial Research (CSIR)द्वारे सादर करण्यात आला आहे. या अहवालाला ICMR चा टेक्निकल आधार आहे, असे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले. आयुषच्या औषधं, उपचार यांचा काय परिणाम होतो हे तपासण्यात येईल. तसंच अधिक धोक्याच्या ठिकाणीही याचे परिणाम पडताळून पाहण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

ANI Tweet:

भारतातील कोरोना बाधितांची संख्या 52,952 वर पोहचली आहे. त्यापैकी 15,266 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून 35,902 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 1783 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ही संख्या वाढत असल्याने आयुष मंत्रालयाच्या या प्रयत्नांना यश आल्यास परिस्थितीत नक्कीच बदलू शकते.