Dr Harsh Vardhan | (Photo Credits: ANI)

केंद्रीय आरोग्यमंत्री (Union Health & Family Welfare Minister) डॉ. हर्षवर्धन (Dr Harsh Vardhan) यांनी आज देशाच्या जनतेला विश्वास दिला. कोरोना व्हायरस (Coronavirus संकटाचा सामना करण्यासाठी भारत सक्षम आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने चिंता करुन नये. कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी भारताने सुरुवातीपासूनच आवश्यक उपाययोजना सुरु केली आहे. भारताने जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरस एक साथीचा रोग म्हणून घोषीत करण्यापूर्वीच भारताने कोरोना नियंत्रणासाठी पाऊल उचलले आहे, असेही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.

डॉ. हर्षवर्धन यांनी डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफ यांच्यासोबत संवाद साधला. या वेळी ते म्हणाले की, आज देशातील डॉक्टर्स देशासाठी जे योगदान देत आहे त्याचा अवघ्या जगाला गर्व आहे. सर्वांनाच माहिती आहे की, आज आपण कशा स्थितीत काम करतो आहोत. जो आजार एखाद्या वादळासारखा येण्याची शक्यात होती, त्यावरही आपण सर्वांनी एकोप्याने काम करुन नियंत्रण मिळवले.

भारतात कोरोना व्हायरस नियंत्रणाच्या स्थितीत आहे. आरोग्य विभाग ते आयसीएमआर (इंडियन काऊन्सील ऑफ मेडिकल रिसर्च) पर्यंत सर्व संस्था कोविड 19 नियंत्रणासाठी काम करत आहे. देशात कोरोना व्हायरस चाचण्या आणखी वाढवण्यात येतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, देशात कोरोना व्हायरस संक्रमन होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढती आहे. परंतू, आनंदाची बाब म्हणजे उपचार केल्यावर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.चीनने ज्या दिवशी अवघ्या जगाला या आजाराबाबत सांगितले तेव्हापासूनच भारताने त्यावर उपाययोजना सुरु केली आहे. त्यामुळे कोरोना भारतात नियंत्रणात आहे. (हेही वाचा, Coronavirus: दिल्लीत होम क्वारंटाइनच्या नियमांचे उल्लंघन केल्याने विविध पोलीस स्थानकात 21 एफआयआर दाखल)

आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या लॉकडाऊन करण्याच्या निर्णयाचाही देशाला फायदा होईल. देशभरातील डॉक्टर्सनी आणि आरोग्य सेवेत काम करणाऱ्या सर्वांनीच हेवा वाटावा असे काम केले आहे. त्यामुळे त्यांचे जितके आभार मानावे तितके थोडेच आहेत.