Chhattisgarh: धक्कादायक! वडिलांचा 3 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; गुन्हा दाखल
Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

छत्तीसगडची (Chhattisgarh) राजधानी रायपूर (Raipur) येथे एका 30 वर्षीय व्यक्तीवर त्याच्या तीन वर्षाच्या सावत्र मुलीवर बलात्कार (Rape) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. रायपूरचे पोलिस अधीक्षक अजय यादव म्हणाले की, आरोपीने 3 जुलै रोजी घरात मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर याबाबत मुलीने आपल्या आईला माहिती दिली. आईने बुधवारी तेलीबांधा पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

या 30 वर्षीय आरोपीवर आयपीसी कलम 376 (बलात्कार), 376 (2) (एफ), 376AB (बारा वर्षाखालील मुलीवर बलात्कार), 342 आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या मुलीची तब्येत ठीक असल्याची माहिती मिळत आहे. आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

यासह, नुकतेच उत्तर प्रदेशमधील रायबरेलीच्या उंचाहार कोतवाली भागात एका तीन वर्षांच्या मुलीवर एका किशोरवयीन मुलाने बलात्काराची घटना घडली आहे. या घटनेनंतर तरुण घटनास्थळावरून फरार झाला. या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तेथे तिची कृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. (हेही वाचा: Rape: पतीसमोरच पत्नीवर बलात्कार, धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

दुसऱ्या एका घटनेमध्ये 22 वर्षांच्या एका विवाहित महिलेवर नोकरीच्या बहाण्याने बलात्कार करण्यात आला आहे. ही महिला दिल्लीच्या कपाशेरा भागात राहते. नोकरी देण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला गुरुग्रामच्या डीएलएफ फेज-2 मध्ये असलेल्या हॉटेलमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. याबाबतचा व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेलही केले.