Chennai Shocker: चेन्नईत प्रेयसीची हत्याकरुन प्रियकराने मृतदेहाचे फोटो ठेवले व्हॉट्सॲप स्टेटसला
Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

चेन्नईतील (Chennai) एका हॉटेलमध्ये 20 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीची तिच्या प्रियकराने हत्या केली होती, या नंतर त्यांने मृतदेहाचे फोटो व्हॉट्सॲप स्टोरी म्हणून पोस्ट केले होते, पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की. आशिक नावाच्या आरोपीचे व्हॉट्सॲप स्टेटस पीडितेच्या मित्रांनी पाहिल्यानंतर ही हत्या उघडकीस आली.मित्रांनी पोलिसांना कळवल्यानंतर अधिकाऱ्यांना हे दोघे राहत असलेल्या खोलीत मुलीचा मृतदेह आढळून आला. ही तरुणी नर्सिंगच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती आणि आरोपीसोबत तिचे पाच वर्षांपासून संबंध होते, असे पोलिसांनी सांगितले. त्यांनी नुकतीच शहरात एक खोली भाड्याने घेतली होती आणि ते एकत्र राहत होते. (हेही वाचा - CRPF Soldiers Injured In IED Blast: दंतेवाडा येथे आयईडी स्फोटात CRPFचे दोन जवान जखमी)

पीडितेने तीन दिवस कॉलेजचे वर्ग चुकवले तेव्हा तिच्या मित्रांनी तिची चौकशी केली आणि कळले की तिचा प्रियकर आशिक चेन्नईला आला होता, त्याने हॉटेलची खोली बुक केली आणि तिला सोबत नेले. मात्र, आशिकच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर महिलेच्या मृतदेहाचे फोटो पहायला मिळाल्याने त्यांना धक्काच बसला. चेन्नई पोलिसांनी शोध सुरू केला आणि एका खाजगी हॉटेलमध्ये मृतदेह सापडला. टीमने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचाही मागोवा घेतला ज्यामुळे आशिकला अटक करण्यात आली.

चौकशीदरम्यान, आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आणि सांगितले की महिलेने त्याच्यावर दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवल्याचा आरोप केल्यामुळे त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे चिडलेल्या आशिकने टीशर्टने तिचा गळा आवळून खून केला.