Chandrayaan-4 Launch In 2027

Chandrayaan-4 Launch In 2027: भारताच्या चांद्रयान-१ आणि चांद्रयान-२ मोहिमेत चंद्राचा पृष्ठभाग आणि एक्सोस्फीअर यांचा अभ्यास करण्यासाठी पाठविण्यात आल्या होत्या. दरम्यान, चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरवण्यात आले होते. आता चांद्रयान-४  मोहिमेसाठी भारत सज्ज झाला आहे. आता भारत पहिल्यांदाच चंद्रावरून नमुने घेऊन येणार आहे. चांद्रयान -4 मोहीम 2027 मध्ये प्रक्षेपित केले जाणार आहे.  गगनयान आणि समुद्रयान मोहिमा पुढील वर्षी म्हणजे 2026 मध्ये प्रक्षेपित केल्या जातील, असे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे. वैज्ञानिक मोहिमांच्या, गगनयान, समुद्रयान आणि चंद्रयान-४ च्या प्रक्षेपणाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. केंद्र सरकारने या तीन प्रमुख वैज्ञानिक मोहिमांच्या प्रक्षेपणाच्या वेळापत्रकावर  शिक्कामोर्तब केले आहे.

चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करून ते पृथ्वीवर परत आणणे हा चांद्रयान-४ मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ही मोहीम दोन स्वतंत्र एलव्हीएम-३ रॉकेट्सचा वापर करून प्रक्षेपित केली जाईल, ज्यात पाच वेगवेगळे मॉड्यूल असतील, असे सांगण्यात आले आहे. गगनयान हा  पूर्णपणे भारतात बनवण्यात आले आहे.

येथे पाहा पोस्ट:

मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, गगनयानाची पहिली मानवरहित मोहीम असणार आहे  ज्यात रोबोट 'व्योममित्र' चा समावेश असेल. सिंह म्हणाले की, गेल्या दशकभरात भारताच्या अंतराळ मिशनमध्ये  लक्षणीय वाढ झाली आहे. समुद्रयान मिशन २०२६ मध्ये सुरू करण्यात येणार असून, त्याअंतर्गत तीन शास्त्रज्ञांना समुद्रात सहा हजार मीटर खोलीवर पाठवण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे समुद्रातील दुर्मिळ खनिजे, मौल्यवान धातू आणि नवीन जैवविविधतेचा शोध घेण्यास मदत होणार आहे.

जितेंद्र सिंह म्हणाले की, देशाची आर्थिक वाढ आणि पर्यावरण संतुलनासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरेल. तसेच अंतराळ आणि महासागर विज्ञान ाच्या क्षेत्रात ही भारतासाठी महत्त्वाची कामगिरी ठरेल.