CBI | (Photo credit: archived, edited, representative image)

राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (NEET-UG) पेपर लीक प्रकरणी CBI ने राजस्थानच्या भरतपूर मेडिकल कॉलेजच्या दोन वैद्यकीय विद्यार्थ्यांसह तीन जणांना अटक केली आहे. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार मंगलम बिश्नोई आणि दीपेंद्र कुमार अशी अटक करण्यात आलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांची नावे आहेत. तांत्रिक निरीक्षण पथकाने परीक्षेच्या दिवशी हजारीबाग, झारखंड येथे त्याच्या उपस्थितीची पुष्टी केली आहे. अटक करण्यात आलेला दुसरा व्यक्ती, शशी कुमार पासवान हा 'ऑलराउंडर' आहे. तो राजाला सर्व प्रकारची मदत करत होता. (हेही वाचा - Manorama Khedkar Police Custody: पूजा खेडकरची आई मनोरमा यांच्या पोलीस कोठडीत वाढ)

सीबीआयने अटक केलेले दोन्ही विद्यार्थी हे राजस्थानच्या भरतपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. कुमार मंगलम बिश्नोई आणि दिपेंद्र कुमार, अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. यापैकी कुमार मंगलम बिश्नोई हा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहेत, तर दिपेंद्र कुमार प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. हे तिन्ही जण पेपर सोडवण्यासाठी 5 मे रोजी सकाळी हजारीबागेत उपस्थित होते, अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे.

पाहा पोस्ट -

दरम्यान, या नीट परीक्षेतील गैरप्रकारांबाबत सीबीआय तपास करत असून आतापर्यंत बिहार, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानमध्ये विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून एकट्या बिहारमध्ये सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.