राज्यातच नाहीतर संपूर्ण देशभरात वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. पूजा खेडकरविरूद्ध आता UPSC ने एफआयआर दाखल केला आहे. इतकंच नाहीतर पूजा खेडकरला कारणे द्या नोटीसही पाठवण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविणाऱ्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवस वाढ करण्याचे आदेश पौड न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बरडे यांनी शनिवारी दिले. (हेही वाचा - Pistol Seized from Manorama Khedkar's Residence: मनोरमा खेडकर यांच्या पुण्यातील राहत्या घरातून पिस्तूल जप्त; शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकवल्याप्रकरणी करण्यात आली कारवाई)
दरम्यान मनोरमा खेडकरने वापरलेली पिस्तुल फॉरेन्सिकला पाठवली जाणार आहे. मनोरमा खेडकर यांनी फायर केलं होतं का फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये स्पष्ट होणार आहे. कोर्टाने विचारलं की फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये फायर केलंय हे कळत का? पोलिसांना असा सवाल केला. पिस्तुल कुठून घेतली आणि कायदेशीर आहे का हे पण तपासलं जाणार याचाही तपास होणार आहे.
दरम्यान आज पोलीस कोडठीची तारीख संपल्यावर कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये मनोरमा खेडकरने पुणे पोलिसांवर आरोप केले आहेत. मला जेवण वेळेवर मिळत नाही. आज मला 9 ला चहा मिळाला आणि जेवण दीड वाजता मिळालं. मी ज्या रूममध्ये झोपते ती रूम ओली असल्याची तक्रार कोर्टामध्ये केली. त्यानंतर कोर्टाने सीसीटीव्ही फुटेज मागवत त्यांना सगळ्या गोष्टी वेळेवर मिळायला हव्या असं सांगितलं आहे.