Pistol Seized from Manorama Khedkar's Residence: पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) शुक्रवारी मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांच्या पुण्यातील घरातून एक कार, एक परवाना असलेले पिस्तूल (Pistol) आणि तीन गोळ्या जप्त केल्या. वादग्रस्त IAS प्रोबेशनर पूजा खेडकर (Puja Khedkar) ची आई मनोरमा खेडकर यांना जमिनीच्या वादातून काही लोकांना बंदूक दाखवून धमकावले होते. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. रायगड जिल्ह्यातील महाड येथून त्यांना पहाटे ताब्यात घेण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोरमा खेडकर या महाडमधील हिरकणीवाडी येथील एका लॉजमध्ये लपून बसल्या होत्या. पकडल्यानंतर मनोरमा खेडकर यांना पुणे जिल्ह्यातील पौड पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पुणे ग्रामीणमधील पौड पोलिसांनी खेडकर दाम्पत्य आणि इतर पाच जणांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलमांतर्गत 323 आणि शस्त्रास्त्र कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा -FIR Against IAS Puja Khedkar: प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्यावर कारवाई; UPSC ने दाखल केला FIR; काय आहे नेमकं प्रकरण? वाचा)
दरम्यान, शुक्रवारी UPSC ने पूजा खेडकर यांच्यावर फसवणूकीचे आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. सध्या पूजा खेडकर यांची चौकशी सुरू आहे. या वादाच्या दरम्यान, सरकारने मंगळवारी पूजा खेडकरचा 'जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम' स्थगित केला. पूजा खेडकर यांना मसुरीस्थित लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमीमध्ये परत बोलावण्यात आले होते. (हेही वाचा -Trainee IAS Pooja Khedkar Case: पूजा खेडकर यांच्या पाथर्डी आणि मुंबईतील घरावर पुणे पोलिसांची छापेमारी, Manorama Khedkar आणि Dilip Khedkar यांचा शोध सुरू)
पहा व्हिडिओ -
Trainee IAS officer Puja's mother Manorama Khedkar has been detained from Mahad, according to Pune SP Pankaj Deshmukh. She is accused of allegedly threatening farmers by brandishing a gun, reports @ymjoshi
— HTMumbai (@HTMumbai) July 18, 2024
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कथित बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरुद्ध खुली चौकशी करण्याची मागणी करणारी तक्रार प्राप्त झाली आहे.