Trainee IAS Pooja Khedkar Case: पूजा खेडकर यांच्या पाथर्डी आणि मुंबईतील घरावर पुणे पोलिसांची छापेमारी, Manorama Khedkar आणि Dilip Khedkar यांचा शोध सुरू

पुणे पोलिसांनी पूजा खेडकरच्या पाथर्डी आणि मुंबईमधील निवासस्थानी छापेमारी केली आहे. पुणे पोलिसांकडून मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा शोध सुरू आहे.

Trainee IAS Pooja Khedkar Case: पूजा खेडकर यांच्या पाथर्डी आणि मुंबईतील घरावर पुणे पोलिसांची छापेमारी, Manorama Khedkar आणि Dilip Khedkar यांचा शोध सुरू
Photo Credit -X

Trainee IAS Pooja Khedkar Case: पूजा खेडकर (Trainee IAS Pooja Khedkar )यांचे आई-वडिल मनोरमा खेडकर(Manorama Khedkar) आणि दिलीप खेडकर (Dilip Khedkar)यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस त्यांचा निवासस्थानी गेले होते. मात्र, तेथे ते दोघेही पोलिसांना आढळले नाहीत. त्यांच्याशी पोलिसांनी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तो काही झाला नाही. त्यामुळे त्यांच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी पाथर्डी आणि मुंबईमधील त्यांच्या निवासस्थानी छापेमारी केली आहे. पुणे पोलिसांकडून मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा शोध सुरू आहे. त्या शोध मोहिमेचाच हा एक भाग होता. पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील फार्म हाऊसवर छापेमारी करण्यात आली.(हेही वाचा:IAS Pooja Khedkar Family Absconding: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे पालक फरार, पुणे पोलिसांकडून शोध सुरू)

पुणे ग्रामीण पोलिसांच्या पौड पोलीस ठाण्यात मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल (IAS officer Pooja Khedkar) आहेत. बंदुकीचा धाक दाखवत शेतकऱ्याला धमकवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पूजा खेडकर यांच्या आईला बंदूक परत करण्यासाठी काल पुणे पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानंतर आता पूजा खेडकर यांच्या पालकांशी संपर्क होत नसल्यामुळे पुणे पोलिस विविध शहरांत त्यांचा शोध घेत असल्याचं समोर आलंय.

दरम्यान, खासगी गाडीवर लाल दिवा लावणे, वरीष्ठ अधिकाऱ्यांशी गैरवर्तणूक करणे यामुळे आयएएस अधिकारी पूजा खेडकर या वादात सापडल्या होत्या. त्यामुळे त्यांची बदली वाशिमला करण्यात आली. त्यानंतर दररोज याप्रकरणी नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यांनी नाव बदलून परीक्षा दिल्याचं देखील बोललं जातयं. युपीएससी प्रशासनाला खोट दिव्यांगत्व प्रमाणपत्रावर देखील दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, त्यांच्या संपूर्ण सिलेक्शन पद्धतीची चौकशी होण्याची शक्यता आहे.

 

(The above story first appeared on LatestLY on Jul 16, 2024 10:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).